आपला जिल्हा

खडी-मुरूम चोरून नेणाऱ्या महाफुकट्यांवर तहसील कार्यालय “मेहरबान”;अनाधिकृत खडी क्रशरवर कधी कारवाई होणार

गेवराई — येथील महसूल विभागाला जवळपास दोन कोटीचा चुना लावणाऱ्या खडी क्रशरच्या महाफुकट्या गुतेदाराला तहसील प्रशासन पाठीशी घालत असून, तक्रार करून ही दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खडी-मुरूम चोरून नेणाऱ्या महाफुकट्यांवर तहसील कार्यालय “मेहरबान” असून, अनाधिकृत खडी क्रशरवर कधी कारवाई होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज विभागाकडून परळी येथील एका गुत्तेदाराने, गेवराई तहसील प्रशासनाकडून वर्षभरासाठी मुरूम उत्खनन व वाहतूक परवानगी घेऊन, आयआरबीला मुरूम पुरविला होता. करार संपल्यावर ही, तब्बल दोन वर्ष संबंधित गुत्तेदाराने लाखो ब्रास मुरूम-खडीचे उत्खनन व वाहतूक केल्याची माहीती उघडकीस आली असून, संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. गोविंदवाडी – मन्यारवाडी ग्रामपंचायतीने तातडीने ठराव घेऊन, खडी क्रशर बंद करण्याची विनंती जिल्हाधिकारी, बीड यांना केली आहे. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरच्या पालख्या डोंगर आणि बालग्रामच्या अगदीच थोड्या अंतरावर परळी येथील एका मुंडे नामक गुत्तेदाराचे खडी क्रशर सुरू केले आहे. या गुतेदाराने जानेवारी 2018 मध्ये गोविंदवाडी येथील एका शेतकर्‍याची सात एकर जमीन विकत घेतली होती. त्याच वर्षी तहसील कार्यालयाकडून परवानगी घेऊन ,राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारा मुरूम, आयआरबी संचालकाशी करार करून पुरविला होता. त्यासाठी नाममात्र राॅयल्टी भरली होती. मुरूम उत्खनन व वाहतूक परवानगी व आयआरबीचा करार डिसेंबर 2018 च्या शेवटी संपुष्टात आला असताना देखील गुत्तेदाराराने तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल प्रशासनाशी संगनमत करून या ठिकाणाहून खडी व मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केली आहे. दिवसरात्र मिळून सत्तर ते अंशी टिप्पर भरून जात होते. एका टिप्पर मध्ये सहा ते सात ब्रास माल बसतो. कसलाही महसूल न भरता, या गुत्तेदारारने लाखो ब्रास खडी – मुरूमाचे उत्खनन करून वाहतूक केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे. दरम्यान, गेवराई तहसील प्रशासनाने खडी क्रशरची पहाणी केली आहे. संबंधित अधिकारी घटनास्थळावर झालेले उत्खनन पाहून अवाक झाले होते. तूर्त खडी क्रशर सुरू करू नका, असे तोंडी आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर, तहसील कार्यालया कडून काहीही कारवाई झाली नाही.
या परीसरात जमीन लेव्हल पासून चाळीस फुटाचे मोठ मोठे खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. नियमांनुसार उत्खनन व वाहतूक झालेली नाही. या खडी क्रशर कडे तहसील व महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. महसूल विभागाला दोन कोटीचा चुना लावणाऱ्या खडी क्रशरच्या महाफुकट्या गुतेदाराला तहसील प्रशासन पाठीशी घालत आहे. तक्रार करून ही दखल घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खडी-मुरूम चोरून नेणाऱ्या महाफुक्ट्यावर तहसील कार्यालय एवढे “मेहरबान” का झाले आहे. अनाधिकृत खडी क्रशरवर कारवाई कधी होणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close