क्राईम

मथुरेतील आश्रमात दोन साधूंचा संशयास्पद मृत्यू

मथुरा – आश्रमातील दोन सांधूचा संशयास्पद मृत्यू झाला . आहे. तर अन्य एक साधूची प्रकृती गंभीर आहे. उत्तर प्रदेशातल्या मथुरेतील गोवर्धनमधील जंगलात असलेल्या आश्रमात शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. साधूंच्या मृत्यूची माहिती समजताच परिसरात खळबळ माजली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

गोपाल दास आणि श्याम सुंदर दास अशी संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या दोन साधूंची नावे आहे. तर रामबाबू दास यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर्धनच्या गिरीराज बागेच्या मागे तीन साधू एका वर्षापासून आश्रम तयार करून राहत होते. शनिवारी (दि. 21) सकाळी दहाच्या सुमारास दोन साधूंच्या मृत्यूची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे एकच खळबळ माजली. आश्रमात असलेल्या गायीच्या दूधापासून चहा प्यायल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर येत आहे. तर विष देऊन हत्या करण्यात आल्याचा आरोप गोपाल दास यांचे भाऊ टीकम यांनी केला. डीएम, एसएसपीसह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. या प्रकरणात चित्रीकरण करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close