आरोग्य व शिक्षण

कोरोनाच्या सावटात बीड जिल्ह्यातील शाळा दोन टप्प्यात सुरू होणार

बीड — राज्य शासनाने 10 नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नववी ते बारावी चे वर्ग 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पूर्ण करण्यात आली आहे त्या सर्व शाळा पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत.

बीड जिल्ह्यात इयत्ता 9 वी ते 12 वी च्या एकूण 768 शाळा असून 6600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड संदर्भातील आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली आहे त्याच शाळा पहिल्या टप्प्यात दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत.आज पर्यंत 2627 कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे काम सुरू आहे चाचणी संबंधित काम दिनांक 24 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे उर्वरित शाळा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दिनांक 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
सर्व शाळांनी शासन परिपत्रक दिनांक 10 नोव्हेंबर 2020 मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे या शाळेतील कर्मचाऱ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे त्या शाळांची यादी दिनांक 22 नोव्हेंबर पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध असणार आहे असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ विक्रम सारूक व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी कळवले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close