आपला जिल्हा

महसुल व पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे महसूल पथकावर हल्ला — डॉ, गणेश ढवळे 

बीड  —- जिल्ह्यातील वाळू तस्करांची मजल महसूल पथकावर हल्ला करण्यापर्यंत जाण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाची बोटचेपेपणाची भुमिका व निष्क्रियताच कारणीभूत असून आष्टी तालुक्यातील मौजे घोंगडेवाडी येथील वाळू तस्करी प्रकरणात तहसीलदार यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊन ६ महिने झाले परंतु अद्याप गुन्हा दाखल करण्यात अाला नाही, त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसूल मंत्री यांना लेखी तक्रार केली आहे,

वाळू तस्करीतील आरोंपाचा थोरला बंधू पोलीस पाटील तर वडील सरपंच, म्हणून कारवाईस टाळाटाळ
वाळू तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या आनिल माळशिखरे यांचे पोलीस पाटील जनार्दन माळशिखरे हे सख्खे थोरले बंधू आहेत तर वडील सरपंच आहेत त्यामुळे ६ महिने झाले तरी कारवाई करण्यात आली नाही, तसेच तत्कालीन तहसीलदार वैभव महेंद्रकर यांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व पोलीस पाटील जनार्दन माळशिखरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी

 आष्टी तालुक्यातील मौजे घोंगडेवाडी येथील अनिल भिमराव साखरे यांनी सीनापात्रातील वाळू उपसा करून तो साठा स्वतःच्या शेतात ठेवला होता, तहसीलदार निलिमा थेऊरकर यांनी मंडळाधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी करून तो साठा जप्त करून ५४ लाख १९ हजार २० रुपयांचा दंड केला होता आणि तोच साठा आनिल माळशिखरे यांचा भाऊ पोलीस पाटील जनार्दन माळशिखरे यांच्या ताब्यात पंचनामा करून दिला, दोन महिन्यानंतर तो साठा त्याठिकाणी आढळून आला नाही, तो गायब झाल्याचा अहवाल मंडळाधिका-यांनी तहसिलदारांना दिला, परंतु तत्कालीन तहसीलदार वैभव महेंद्रकर यांनी याकडे दुर्लक्ष केले, याप्रकरणी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदारांनी पोलीस पाटीलांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु याप्रकरणी महसुल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या बोटचेपेपणाची भुमिका व हलगर्जीपणमुळे वाळू तस्करांची हिंमत वाढली आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील महसूल पथकावर हल्ला तर आष्टी तालुक्यातील महसूल पथकाने जप्त केलेली बोट पळवुन नेण्याची हिंमत करतात त्यामुळे याप्रकरणी संबंधित महसूल व पोलीस प्रशासनाच्या आधिका-यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री, विभागीय आयुक्तांना केली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close