देश विदेश

पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात 1300वर्ष पुरातन विष्णू मंदिर सापडलं

कराची — पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्व विभागाने स्वात जिल्ह्यातील एका पर्वतावर तेराशे वर्ष पुरातन हिंदूंचे विष्णू मंदिर शोधून काढले आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पुरातत्व विभागाचे अधिकारी फजल खालिक यांनी गुरुवारी या शोधाची अधिकृत घोषणा केली असून हे मंदिर भगवान विष्णूचा असल्याचं त्यांनी सांगितलं
पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात असलेल्या स्वात जिल्ह्यात बारिकोट घूंडई येथे इटलीच्या पुरातत्त्व विभागाच्या मदतीने उत्खनन सुरू आहे. या उत्खनना दरम्यान हिंदू शाही काळात तेराशे वर्षापूर्वी हिंदूंनी हे मंदिर बांधले होते. हिंदू शाही किंवा काबुल शाही एक हिंदू राजवंश असल्याचं पुरातत्ववेत्ते फजल खालिक यांनी सांगितलं. या राजवंशाच साम्राज्य काबुल खोर (सध्याच पूर्व अफगाणिस्तान ), गंधार ( आधुनिक पाकिस्तान व अफगानिस्तान ) तसेच सध्याच्या वायव्य भारतात विस्तारलेले होते. या मंदिर उत्खनना दरम्यान पुरातत्त्व शास्त्रज्ञांना मंदिराच्या जवळ छावण्यांचे तसेच पहारेकर्‍यांसाठी बांधण्यात आलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेष आढळून आले. गंधार संस्कृतीच प्रतीक असलेल्या या मंदिर परिसरात पाण्याचा एक कुंड सापडला आहे हिंदू देव दर्शनाला जाण्यापूर्वी या कुंडात स्नान करत असावेत असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
स्वात जिल्हा हजारो वर्षापूर्वीच्या पुरातन वास्तूंच माहेरघर समजल्या जात. या ठिकाणी हिंदू शाही काळातील खुणा पहिल्यांदाच सापडल्या असल्याचं खलिक यांनी सांगितलं.
स्वात जिल्ह्यात सापडलेल्या गांधार संस्कृतीतील हे पहिलं मंदिर असल्याची माहिती इटालियन पुरातत्त्व मिशनचे प्रमुख डॉक्टर लुका यांनी दिली. बौद्ध धर्माचीही अनेक पूजास्थळं स्वात जिल्ह्यात सापडलेले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close