महाराष्ट्र

निती ‘न’सलेल्या धार्मिकतेचा उच्छाद: जिल्ह्यात दारुचा महापूर

बीड — लॉक डाऊन मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने सुरुवातीला दारूला पहिले प्राधान्य दिले. विनोदाने का होईना पण बेवड्यांना अर्थ सैनिक म्हटले जाऊ लागले याच अर्थ सैनिकांना प्रोत्साहन देण्याचे काम निती ‘न’सलेल्या ‘धार्मिक’ते कडून होत आहे.

जिल्ह्यातील राज्य रस्त्यावरील असो की राष्ट्रीय महामार्गावरील धाब्यावर असो सर्रास देशी-विदेशी दारूची विक्री खुलेआम केली जात आहे. याकरिता आता दारूविक्री परवाना अथवा बियर बारचा काढण्याची त्याकरिता हजारो रुपये डिपॉझिट ठेवण्याची आवश्यकता नाही. फक्त थोडीशी रक्कम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धार्मिक नावाच्या अधिकाऱ्याच्या माणसाजवळ दिली की दारू खुलेआम विक्री करण्याचा परवाना आपोआप मिळत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

———————————————–
अभिमानास्पद धाडसी कारवाई!
शुक्रवारी पोलीस उपअधीक्षकांच्या डीबी पथकाने धाडसी कारवाई करत वाईन शॉप मधून पंधरा-वीस विदेशी दारू च्या बाटल्या सह दुचाकी जप्त केली नगर रोड जवळ ही धाडसी कारवाई करण्यात आली. माध्यमांनी देखील कधी नव्हे ती एवढी मोठी कारवाई झाल्यामुळे ठळक अक्षरात प्रसिद्धी दिली. या धाडसी कारवाईमुळे सर्वसामान्यांची मान उंचावली आहे.

लाॅक डाऊन मूळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नियम शिथिल करताना सुरुवातीला दारू विक्रीला प्रथम प्राधान्य देण्यात आले. सरकारच्या या भूमिकेवर टीका टिप्पणी करताना बेवड्यांना विनोदाने का होईना पण अर्थ सैनिकांची उपाधी देण्यात आली. या प्रकाराला आणखी गती देण्याच काम व या अर्थ सैनिकांचा सन्मान राखत बीडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जागोजाग त्यांची सोय उपलब्ध करून दिली. प्रत्येक धाबा असो की टपरी असो किंवा मग एखादा डोंगर पट्टा असो प्रत्येक ठिकाणी दारूची सुविधा निर्माण केली. जिल्ह्यात सध्या दारूबंदी अधिकारी नितीन धार्मिक यांनी सरकारी नियमानुसार दारू विक्री करण्यासाठी परवाना काढताना लोकांना होणारा त्रास कायमचा बंद केला आहे. कागदपत्रांची जमवाजमव करण्याची झंझट नाही. परवाना काढताना सरकारकडे डिपॉझिट रक्कम ठेवण्याची आवश्यकता देखील ठेवली नाही. फक्त धार्मिक यांचा होकार व महिन्याकाठी थोडेसे शुल्क त्यांच्या झोळीत टाकले की दारूविक्री करायला कोणीच अडवत नसल्याचे पहावयास मिळत आहे. गाव खेड्यामध्ये देखील त्यामुळे देशी विदेशी दारू सोबतच हातभट्टी विक्री व्यवसायाला देखील चालना मिळत आहे. यातून जिल्ह्यातील हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचा महत्वपूर्ण कर्तव्य नितीन धार्मिक यांनी पार पाडला आहे. यातून अनेकांचे संसार उध्वस्त होत असले तरी पण राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संसार मात्र भरभराटीचे समृद्धीने परिपूर्ण बनत आहेत. राहिला प्रश्न देशाच्या अर्थव्यवस्थेचा सरकारला टॅक्स मिळाला काय न मिळाला काय दारूशी संबंधित इतर व्यवसायातून काही प्रमाणात का होईना टॅक्स मिळतो असं नव लॉजिक धार्मिक यांनी राबवल आहे. सर्रास प्रत्येक धाब्यावर दारू मिळत असल्यामुळे हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close