महाराष्ट्र

कार्तिकी एकादशीला माऊलीच्या दर्शनाला मूकावे लागणार, संचारबंदी लागू होणार

पंढरपूर — कोरोना संकट वाढण्याची भीती निर्माण झाल्यामुळे कार्तिकी एकादशीला देखील वारकऱ्यांना माऊली च्या दर्शनाला मुकावे लागणार आहे कार्तिकी यात्रा काळात पंढरपुरात संचारबंदी लागू केली जाणार आहे. याशिवाय चार दिवस बस सेवाही बंद राहणार आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी याविषयीची माहिती दिली.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारबरोबरच जिल्हा प्रशासनाकडूनही विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रे संदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढपूरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून २६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत पंढरपूरकडे येणारी एसटी बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे.तसेच कार्तिकी एकादशीचा सोहळा २६ नोव्हेंबर रोजी होत असल्यानं दशमीपासून म्हणजेच २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून एकादशीच्या रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजेच २६ नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहरासह परिसरातील ५ ते १० किलोमीटरपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक झेंडे यांनी दिली.

ज्या भाविकांनी अथवा दिंड्यांनी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण केलं असेल, त्यांनी परत जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले गेले आहे. भाविकांना व दिंड्यांना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरूनच परत पाठविण्यात येणार असल्याचंही झेंडे यांनी सांगितले. कार्तिकी यात्रा काळात कोणत्याही भाविकांनी मंदिरापर्यंत अथवा चंद्रभागेपर्यंत जाऊ नये, यासाठी मंदिर व चंद्रभागा परिसराला तिहेरी बॅरेंगेटिंग केलं जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान आज प्रशासनाने वारकरी संप्रदायांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा करू देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जात असली, तरी कोरोनाचा वाढता धोका बघता शासन व प्रशासनाकडून त्याला परवानगी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. यात्रा काळात पंढरपुरात असणाऱ्या काही मोजक्या महाराज मंडळींना कोरोनाचे नियम पाळून चंद्रभागा स्नान व नगर प्रदक्षिणेला काही मूभा देण्याबद्दल सध्या प्रशासनाकडून विचार केला जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close