आपला जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देताच शहरातील रस्त्यांचे बंद पाडलेली कामे सुरू; नगराध्यक्षांनी केली पाहणी

बीड — बीड शहरातील अमरधाम स्मशानभूमी ते रामतीर्थ या रस्त्याच्या कामास जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देताच शहरातील रस्त्यांचे बंद पाडलेली कामे सुरू कामास काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सुरू झाली होती. परंतु विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे हे काम बंद पाडले होते

. त्यामुळे या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहन धारकांना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. हीच बाब नगराध्यक्षांनी बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिली. यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करत शहरातील बंद पाडलेली कामे ताबडतोब सुरू करण्याचे आदेश दिले व जे कोणी या कामात अडचण निर्माण करतील अशा लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश देखील दिले.

त्यानुसार अमरधाम स्मशानभूमी ते रामतीर्थ या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. या सुरू झालेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या व रस्त्याचे काम उत्कृष्ठ आणि चांगल्या दर्जाचे करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे आभार मानले व जे कोणी रस्त्याचे काम अडवून विकास कामात अडथळा निर्माण करतील अशा लोकांना आता आम्हीच धडा शिकवू असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक प्रेम चांदणे, विकास जोगदंड, शैलाताई मुसुळे, ईश्वर धनवे, विलास मोमीन, विशाल मोरे, फामजी पारीख, सुदर्शन नाईकवाडे, सतपाल लाहोट यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close