क्राईम

पून्हा फक्त इशाराच : तलाठी- मंडळ अधिकाऱ्यांनो अपडेट रहा, वाळू चोरी करणाऱ्या तस्करांचे कंबरडेच मोडून काढू —  रेखावार

अवैध वाळू वाहतूक राखणार्‍या तहसील पथकावर वाळू तस्कर गुंडांचा हल्ला  ——————————————————

गेवराई — वाळू चोरी कोण करतय, त्यासाठी आजूबाजूला उभी असलेली वाहने कशासाठी आलीत; या सगळ्या प्रकरणाची माहीती तलाठी-मंडळ अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांना आहे का नाही. नसेल तर मग , तुम्हाला नेमक काय माहीत आहे. असा सवाल उपस्थित करून, अरे, वाळू तस्करी करणारे गुंड थेट मारायची हिमंत कशी काय करतात.
तुम्हाला मारले, म्हणजेच मला मारल्या सारखे आहे. बघून-सवरून तो मी नव्हेच , ही हरामखोरी आहे. तुम्ही अपडेट रहा, तस्कारांचे कंबरडे मोडायला मी खंबीर असल्याचा इशारा जिल्हाधिकारी रेखावार यांनी येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना दिल्याची चर्चा आहे.
यापुढे, गोदाकाठी वाळू साठा आढळून आल्यास तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून, कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम ही त्यांनी यावेळी बैठकीत बोलताना दिला आहे. दरम्यान, या आधीही तत्कालीन तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने धडक देऊन, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी तातडीने येऊन, तस्कारांचा माज जिरवण्याची भाषा केली होती. मात्र, एवढे महिने उलटून ही वाळू चोरी करणार्‍या तस्कर गुंडाची दहशत कायम असून, साहेबांचे काय, ते येतात, बोलतात आणि जातात, अशा बोलक्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.वाळुची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या तस्कारांनी तहसीलदारांच्या महसूल पथकावर अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवार ता. 20 रोजी सकाळी नऊ वाजता घडली असून, या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनेची माहीती कळताच जिल्हाधिकारी रेखावार यांनी घटनास्थळी भेट देऊन, तहसील कार्यालयात विशेष बैठक घेतली आहे. या हल्याने गोदाकाठी सेवेत असलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या हद्दीत अनाधिकृत वाळुचा उपसा सुरुच असून, वाळू तस्करी रोखण्यास महसूल आणि पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. दरम्यान ,तालुक्यातील
बोरगाव बुद्रुक शिवारात चोरट्या पद्धतीने वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलच्या महसूल पथकाला मिळताच, सबंधित पथकाने तातडीने घटनास्थळावर जावून एका टिप्पर चालकास विचारपूस करताच, गाडीमध्ये आलेल्या काही गुंडानी पथकावर अचानक हल्ला केला. घटनेत चार कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अज्ञात वाळू तस्करां विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी घटनास्थळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार भेट दिली. या घटनेने एकदा खळबळ उडाली असून, कर्मचारी दहशतीखाली आलेत. चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव बुद्रुक शिवारातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांना मिळाल्यावर , महसूल विभागाचे मंडल अधिकारी अमोल कुरुळकर, तलाठी राजकुमार धारूरकर, कोतवाल योगेश शहाणे, शिवशंकर आतकरे, दीपक राठोड यांनी घटनास्थळ गाठले. बोरगाव ते कुरणपिंप्री रस्त्यावर या पथकाला पांढर्‍या रंगाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परला थांबवून त्यांनी चालकाशी विचारपूस करताच, अचानक पाठीमागून एक लाल रंगाची गाडी आली. ( क्र. एम.एच. 16 डी.झेड. 9701 ) गाडीतील गुंडानी पथकातील कर्मचार्‍यांना काठीने मारहाण केल्याने, संजय शंकर नेवडे (वय 41), योगेश सुरेश शहाणे (वय 24), शिवशंकर सुरेश आतकरे (वय 26) आणि दिपक आसाराम राठोड (वय 37) हे चारजण जखमी झाले. या प्रकरणी संजय नेवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीं विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ,शुक्रवार ता. 20 रोजी बीड जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजता तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्याशी तहसील पथकावर वाळू तस्कारांनी केलेल्या मारहाण प्रकरणावर बंद दाराआड चर्चा केली.
पथक मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, गेवराई तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी कर्मचारी – अधिकाऱ्यांना चांगलेच झापले असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close