क्राईम

सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

परळी — घराजवळच राहत असलेल्या तरुणाकडून सतत होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सावतामाळी नगर येथे घडली. दरम्यान याप्रकरणी छेडछाड करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी शहरातील सावता माळी नगर येथे मंगेश भास्कर राव भास्करराव कोपनबैने हा 29 वर्षीय तरुण घराजवळ राहत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून सतत तिचा पाठलाग करत त्रास देत होता. बोलण्यासाठी आग्रह करणे तसेच मोबाईल नंबर मागणे हे गेल्या अनेक दिवसापासून सुरू होते. मात्र सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून बुधवारी या अल्पवयीन मुलीने राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश कोपनबैने याच्यावर कलम 306 354 (ड) पॉक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर पोलीसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी एच मेंडके करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close