राजकीय

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची नाराजी सतीश चव्हाण यांना भोवणार

बीड — माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळले त्यामुळे संस्थानिक असलेले जयदत्त क्षीरसागर मोठ्या प्रमाणावर दुखावले गेले आहेत. त्यांच्या एक गठ्ठा मताचा फटका पदवीधर निवडणुकीचे महा विकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे क्षीरसागरांच्या चहाते वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेतात याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

पदवीधर मतदार संघामध्ये चौरंगी लढत होण्याचे चित्र निर्माण झाले आहे भाजप चे शिरीष बोराळकर, महा विकास आघाडीचे सतीश चव्हाण तर भाजप वरून नाराज होत बंडाचा झेंडा हातात घेत गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेवर एकला चलो रे’ची भूमिका घेत रमेश पोकळे, भाजपचे बंडखोर प्रविण घुगे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बंडखोरी, फोडाफोडी, नाराजी, यामुळे निवडणुकीत आणखी रंग भरला जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. ते राष्ट्रवादी मध्ये डेरेदाखल होणार आहेत. याबरोबरच शिवसंग्राम चे विनायक मेटे यांनी भाजपने आपल्याला देखील किंमत दिली नसल्याचे सांगत भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रमेश पोकळे यांनी व प्रविण घुगे यांनी बंडाचा झेंडा आणखी बुलंद केला आहे. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ या एका संस्थेच्या जीवावर बोरकरांचे यश अशक्यप्राय आहे. भाजपाला लागलेल्या फुटीरतेच्या ग्रहणामुळे सध्यातरी सतीश चव्हाण यांचे पारडे जड होत असल्याचे दिसत आहे.
मात्र कुठल्याही राजकारणामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे कानाडोळा करणे म्हणजे स्वतःच्या हाताने पायावर कुर्‍हाड मारून घेण्याचा प्रकार झाल्याशिवाय राहत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. सुरेश धस यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर मुळे विजय मिळवता आला. यापूर्वीदेखील जयदत्त क्षीरसागर यांच्या मदतीमुळे सतीश चव्हाण यांची नौका निवडणूकीत पार पडली आहे. असं असताना देखील सतीश चव्हाण यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे नाव वगळण्याची चूक केली. सेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना जास्त महत्त्व दिले गेले. शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुख चे स्थान मोठे मानले जात असले तरी एकंदर निवडणूक काळात क्षिरसागर यांचे महत्त्व कमी करणे सतीश चव्हाण यांना महागात पडू शकते. राष्ट्रवादीच्या वळचणीला आलेले माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांना देखील क्षीरसागर यांनी केलेल्या मदतीमुळेच बीड जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत यश मिळाले आहे.
क्षीरसागर यांची ही ताकद पदवीधर मतदार संघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किंवा प्रत्येक निवडणुकीत मोठी आहे. याचा फटका सतीश चव्हाण यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता ही नाराजी सतीश चव्हाण दूर करण्यात कितपत यशस्वी होतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. एकंदरच सतीश चव्हाण यांच्या डावलण्यामुळे क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या एकगठ्ठा मतदानाला चव्हाण यांना मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close