राजकीय

माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड भाजपातून बाहेर

बीड — बीडचे माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री जयसिंग गायकवाड यांना डावलत पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी न दिल्यामुळे भाजपच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. ते आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. २०१० मध्ये जयसिंग गायकवाड हे भाजपात परतले होते.

मुळचे भाजप कार्यकर्ते असलेले जयसिंग गायकवाड यांची राजकीय कारकीर्द नेहमीच मतलबी राहिली आहे.त्यांनी २ वेळा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. युती सरकारच्या काळात ते राज्यात तर रालोआ सरकारच्या काळात केंद्रात राज्यमंत्री होते. मात्र २००४ मध्ये त्यांनी मुंडे महाजनांच्या राजकारणाला वैतागून भाजप सोडला होता. तसेच राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र २००९ मध्ये त्यांनी खासदारकीचा कार्यकाळ संपताच पुन्हा राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. तेथे देखील फारसे साध्य होणार नाही हे लक्षात येताच
२०१० मध्ये नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या आवाहनानुसार जयसिंगराव गायकवाड स्वगृही भाजपात परत आले. पक्षाने त्यांच्यावर किसान मोर्चाची जबाबदारी दिली. तसेच २०१९ मध्ये त्यांना औरंगाबाद लोकसभा लढविण्याची देखील तयारी करायला सांगितले होते. मात्र युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेकडे गेल्याने त्यांची संधी हुकली. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी आपला विचार व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र पक्षाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी दिली. ही उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याने त्यांनी मंगळवारी भाजपचा राजीनामा दिला.
दरम्यान विधानपरिषदेसाठी ते सतिश चव्हाण यांना पाठबळ देणार असून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. खडसे नंतर भाजपला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close