आपला जिल्हा

पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी वैभव स्वामी यांची निवड

बीड — महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी वैभव स्वामी यांचे निवड झाल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी करून नियुक्तीचे पत्र दिले.यावेळी दैनिक दिव्य लोकप्रभा’चे संपादक तथा मार्गदर्शक संतोष मानूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी मराठवाड्यात पत्रकार संघाची बांधणी आणि संघटन मजबूत करण्यासाठी पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांची मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली. जागतिक पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि.16 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11:30 वाजता सदरील निवडीची घोषणा केली. यावेळी दैनिक दिव्य लोकप्रभा’चे संपादक तथा मार्गदर्शक संतोष मानूरकर यांची विशेष उपस्थिती होती.प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे आणि मार्गदर्शक संतोषजी मानुरकर यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.यावेळी वादळचे संपादक शेखरकुमार,मराठवाडा साथीचे बीड जिल्हा प्रतिनिधी संदीप बेदरे,लोकपत्रचे बीड जिल्हा प्रतिनिधी नागनाथ जाधव,औरंगाबाद सिटीझनचे बीड जिल्हा प्रतिनिधी रईस खान,आत्माराम वाव्हळ,नितेश उपाध्याय, अनिल घोरड,शिवप्रसाद शिरसाठ,संजय देवा कुलकर्णी, नाना बीडकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.


यानंतर जागतिक पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मान्यवरांनी जागतिक पत्रकार दिनाचे महत्व विस्तृत पणे विषद करत कोरोना महामारी मुळे वृत्तपत्र सृष्टीवर आलेले आर्थिक संकट आणि त्यावर मात करण्यासाठी एकजुटीची गरज असल्याचे मत व्यक्त केले.तर नवनिर्वाचित मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,प्रदेश संघटक संजयजी भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यात पत्रकार संघाची बांधणी मजबूत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न करेल,असे अभिवचन दिले.या निवडीबद्दल पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,प्रदेश संघटक संजयजी भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, वृत्तवाहिनी अध्यक्ष रणधीर कांबळे,प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी, प्रदेश सरचिटणीस सुरेखा खानोरे,मंत्रालय संपर्कप्रमुख नितीन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप भटेवरा,लातूर जिल्हाध्यक्ष अशोक देडे,औरंगाबाद महानगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभु गोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर, परभणी जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवे,नांदेड जिल्हाध्यक्ष गणेश जोशी,हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रदुम्न गिरीकर,जालना जिल्हा अध्यक्ष दिगंबर गुजर,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुनिल बनसोडे आदींसह मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक आणि पत्रकारांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close