कृषीवार्ता

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नाने परळी तालुक्यातील तुती उत्पादक शेतकर्‍यांना प्रत्येकी ७८,६०० रुपये अनुदानाची रक्कम खात्यावर जमा

    • तालुक्यात एकुण १ कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान वितरीत

परळी  —  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी तालुक्यातील तुती (रेशीम शेती) उत्पादक शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून अनुदान स्वरुपात एकुण १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंजूर होवून प्रत्येक तुती उत्पादक शेतकर्‍याच्या खात्यांवर प्रत्येकी ७८६०० रुपये इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

सप्टेंबर व ऑक्टोंबर या दोन महिन्यात परतीच्या पावसाने अनेक पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर तुती अर्थात रेशीम शेती करणारे शेतकरी परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानामुळे चांगलेच अडचणीत आले होते. ही बाब लक्षात घेत ना.धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून तालुक्यातील डाबी, देशमुख टाकळी, परचुंडी, तेलसमुख, पांगरी आदी गावांमधील सर्व तुती उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

ऐन दिवाळीच्या सणात ना.धनंजय मुंडे यांनी शेतकर्‍यांच्या मदतीला धाऊन जात मोठा दिलासा मिळवून दिल्याने तालुक्यातील तुती उत्पादक शेतकर्‍यांनी ना.मुंडे यांचे आभार मानले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close