आपला जिल्हा

आनंदवनात दीपावली साजरी केल्याशिवाय समाधान होत नाही-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

काटे सारुनी इथले तुम्ही अंथरली फुले, आम्हा अनाथांचे पाय आज धन्य धन्य झाले

बीड — दीपावलीचा सण आल्यानंतर आनंदवनाची आठवण येणार नाही असे कधीच झाले नाही येथे येऊन या लहानग्यांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय दीपावलीचा आनंदच मिळत नाही अशी भावना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली

बीड पासुन जवळच असलेल्या आनंदवन याठिकाणी इन्फंट इंडिया या संस्थेतील अनाथ व गरीब मुलांबरोबर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सपत्नीक दीपावली साजरी केली यावेळी ह भ प माऊली महाराज मंझरीकर,सौ प्रतिभाताई क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर,विलास बडगे,अरुण डाके,सखाराम मस्के,चंद्रसेन नवले,बाळासाहेब क्षीरसागर, राऊत सर,नवनाथ राऊत,सर्जेराव खटाणे व एमडी श्रीखंडेआदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी या ठिकाणी असणाऱ्या चिमुकल्यांनी एका काव्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या

काटे सारुनी इथले तुम्ही अंथरली फुले आम्हा अनाथांचे पाय आज धन्य धन्य झाले

तुमच्या स्वागताला आम्ही प्रेम अंथरले आज आनंदवनात तुमच्या प्रेमाची पावले चिमुकल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर येथील काही मुलामुलींनी माऊली माऊली या नामघोषात वारकरी संप्रदायातील वेशभूषेत एक गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली, यावेळी संस्थेचे संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आनंदवनात आल्याशिवाय दीपावली साजरी केल्याचा आनंद मिळत नाही अनाथ उपेक्षित व गरीब बाधित मुलांसाठी ही अखंड सेवा या ठिकाणी सुरु आहे उजाड माळरानावर काहीच नव्हतं आता मोठा बदल होऊ लागला आहे दीपावली साजरी करण्याची ओढ लागावी असे नाते निर्माण झाले आहे अशा संस्थांना उदात्त भावनेने मदत करायला हवी खारीचा वाटा म्हणून आपण या चिमुकल्या मध्ये दरवर्षी येऊन दीपावलीला सुरुवात करतो यानिमित्त समस्या विचारात घेता येतात येथील अडचणी लक्षात येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न कर्तव्य भावनेतून आपण करत असतो सध्याच्या महामार्ग च्या काळात अशा संस्था अडचणीत येत असतात काळजी असावी पण भीती नसावी असे आजचे वातावरण हवे,या महामारीच्या काळात अनेक गोरगरिबांना मोठा फटका बसला माणुसकी नाहीशी व्हावीअशी अनेक उदाहरणे घडली आहेत मात्र आता सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे,माणुसकीचा ओलावा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने आता जिव्हाळ्याचे प्रेमाचे नाते निर्माण करावीत,बारगजे कुटुंबाच्या त्यागाचे खरोखरच कौतुक करायला हवे हे एक प्रकारचे पुण्यकर्मच आहे यातून निश्‍चित आणखी मोठे कार्य घडेल असे सांगून ते म्हणाले की या ठिकाणच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याची जबाबदारी म्हणून अण्णा औषधी भाजीपाला टिकून राहावा यासाठी डिफ्रिजर चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी साऊंड सिस्टिमची गरज होती याचा त्यांना उपयोग होईल यावेळी दीपावली फराळाचे वाटपही करण्यात आले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close