क्राईम

थरार : प्रेयसीला ॲसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बीड — नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील 22 वर्षीय प्रेयसीला नेकनूर जवळ असलेल्या येळंब घाट परिसरात अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची दुर्दैवी घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.धक्कादायक म्हणजे, तब्बल 12 तास ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात तडफडत होती.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 22 वर्षीय पिडित तरुणीचं नाव सावित्रा असं असून ती नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये असलेल्या शेळगाव येथील रहिवासी आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.
दरम्यान, पहाटे 3 वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले.हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के टक्के शरीर भाजले असून प्रकृती स्थिर आहे. काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दुर्दैवी म्हणजे पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत:च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले .पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून नेकनूर पोलीस स्टेशन चे ए.पी.आय.लक्ष्मण केंद्रे पुढील तपास करत आहेत. मात्र, ऐन दिवाळीत ही दुर्देवी घटना उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close