आपला जिल्हा

खाकीतील माणुसकीने एचआयव्ही बाधित मुलांची दिवाळी झाली गोड

बीड — लॉकडाउनच्या काळामध्ये खाकीतील माणुसकीचं दर्शन वारंवार घडलं तसंच माणुसकीच दर्शन पुन्हा पाहावयास मिळाल. इन्फंट इंडिया मधील अनाथ मुलांची दिवाळी पुन्हा बीड पोलिसांनी गोड केली. फराळासह येथील मुलांना सॅनिटायझर भेट दिले. यावेळी पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी सपत्नीक हजर होते.


इन्फंट इंडिया या संस्थेतील एका बालकाचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे यावर्षी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता . मात्र , खाकीतील माणूसकीने दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला . स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी या मुलांसाठी
फराळासह सॅनिटायझर भेट दिले .त्यांच्या या उपक्रमाला पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी सपत्नीक हजेरी लावली . फराळ वाटपासोबत अधिकाऱ्यांच्या धीर देणाऱ्या आपुलकीच्या संवादाने चिमुकले भारावून गेले.संध्या बारगजे व दत्ता बारगजे या दाम्पत्याच्या इन्फंट इंडिया संस्थेत सध्या ६५ चिमुकले वास्तव्य करीत आहेत एचआयव्हीबाधित असल्याने समाज व कुटुंबाकडून दुर्लक्षित झालेल्या या चिमुकल्यांचे या संस्थेत पालन – पोषण केले जाते . उपचार सुविधांसोबतच
शिक्षणही देण्यात येते . या संस्थेच्या कार्याने प्रभावीत झालेल्या भारत राऊत या संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत दिवाळी व वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले आणि मागच्या नऊ वर्षांपासून ते अखंडीतपणे हा उपक्रम राबवितात . विशेष म्हणजे त्यांच्या पोलिस दलात जालना , सोलापूर , गडचिरोली पुन्हा सोलापूर आदी ठिकाणी बदल्या झाल्या . परंतु , त्यांनी या उपक्रमात कधीही खंड पडू दिलाज्ञनाही . यंदाही दिवाळी फराळासह सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले .अपर अधीक्षक सुनील लांजेवार , गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत , पोलिस निरीक्षक संतोष साबळे , उपनिरीक्षक संतोष जोंधळे , सहायक उपनिरीक्षक संजय जायभाये , बालाजी दराडे , अतुल हराळे , प्रसाद कदम , नारायण कोरडे , गहिनीनाथ गर्जे यावेळी उपस्थित होते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close