आपला जिल्हा

कोरोनामुळे दिवाळी पाडव्याचा पान सुपारी कार्यक्रम रद्द

बीड —  यंदा कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिवर्षी दिवाळी पाडव्यानिमित आयोजित केला जाणारा पान सुपारी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.सर्वांनी आनंदी व सुरक्षित राहून कोरोनामुक्त वातावरणात दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बीड येथे क्षीरसागर कुटूंबाच्या वतीने पान सुपारी कार्यक्रम आयोजित करतो मात्र कोरोनाच्या या काळात सर्वांनी सुरक्षित आणि माझे कुटुंब माझी जबाबबदारी म्हणून आपण आपल्या घरीच ही दीपावली आनंदाने व उत्साहात साजरी करावी. अजूनही कोरोनाचा प्रभाव तितका कमी झालेला नाही त्यामुळे येत्या सोमवारी (दि.16) पान सुपारी कार्यक्रम रद्द केला असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close