आपला जिल्हा

फटाक्याचा ठिणगीने दुकान पेटले

बीड — सुभाष रोडवर असलेल्या दिनेश एन्टरप्राईजेसच्या जवळ कोणीतरी फटाके वाजवल्याने याची ठिणगी दुकानात पडून दुकानातील साहित्याने पेट घेतला असल्याची घटना आज सकाळी घडली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आल्यामुळे वेळीच आग आटोक्यात आली व जास्त नूकसान टळले.
सुभाष रोडवर असलेल्या दिनेश एन्टरप्राईजेस नावाच्या फर्निचर दुकानाच्या परिसरामध्ये काहींनी सकाळी फटाके फोडले याची ठिणगी दुकानात पडली आणि आतील वस्तूूंनी पेट घेतला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले . वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे दुकानातील मोठे नुकसान टळले. या दुकानात फ्रिजसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य होते. आग आटोक्यात आल्यामुळे जास्त नुकसान होऊ शकले नाही. दरम्यान नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close