क्राईम

परळीतून व्यापार्‍यांचे 25 लाख दिवसाढवळ्या पळविले

परळी — औरंगाबादच्या व्यापार्‍याने वसुली करून आणलेले 25 लाख रुपये चारचाकी गाडीमध्ये ठेवले होते. अन्य वसुली करण्यासाठी ते गेले होते. गाडीत चालक होता मात्र चालकाने पैसे सोबत न नेता पैसे गाडीत ठेवून तो समोसे आणण्यासाठी गेला या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी गाडीतील 25 लाख रुपये लांबविले. ही घटना आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत घडली.

औरंगाबादचे व्यापारी संजय गंगावले अंबाजोगाईहून परळीला वसुलीसाठी आले होते. त्यांनी वसुलीचे जवळपास 25 लाख रुपये गाडीमध्ये ठेवले आणि इतर ठिकाणची वसुली करण्यासाठी ते परळी शहरामध्ये गेले होते. गाडीत चालक होता. चालक पैसे गाडीत ठेवून समोसे आण्यासाठी गेला. तितक्यात चोरट्यांनी डाव साधत गाडीतील 25 लाख रुपये पळविले. परत आल्यानंतर पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच याची माहिती परळी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close