देश विदेश

तिसऱ्या आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा

नवी दिल्ली — कोरोना काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे.
आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगलं काम करत असल्याचा संकेत दिले असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. कोरोना नंतर भारताचा रिकवरी रेट पाहून मुडीजने आपला अंदाज बदलला आहे यापूर्वी मुडीजने यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी दर उणे 9.6 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. तू आता बदलून 8.9 टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. बँक क्रेडिट मध्ये 5.1 टक्के सुधार जीएसटी परतावा दहा टक्‍क्‍यांनी वाढला आहे परदेशी गुंतवणूक तेरा टक्के अधिक झाल्याचे देखील त्यांनी सांगितले

.
महत्वाचे मुद्दे –

* ऑक्टोबरमध्ये 1.05 लाख जीएसटी परतावा जमा झाला. परताव्यामध्ये 10 टक्के वाढ झाली : केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर

* वन नेशन वन रेशन कार्ड
01 सप्टेंबर 2020 पासून 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड लागू करण्यात आलं आहे. 68.6 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा झाला.

* आत्मनिर्भर भारत -3.0 ची घोषणा.
* कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्था ला आणखी मजबूत करण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न आहे.
* कोरोना संक्रमण देशात वाढत आहे.
* भारतीय अर्थव्यवस्थाला मजबूत करण्यासाठी मागील पाऊले महत्वाचे ठरले आहे.
*भारतीय अर्थव्यवस्थाला ताकद मिळाली आहे.
*12 टक्के वीज ची खपत 12 टक्के वाढली आहे.
* रेल्वे मालवाहक ची 20 टक्के वाढ झाली आहे.
* बँक क्रेडिट मध्ये 5.1 टक्के वाढ झाले आहे.
* आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगला काम करत असल्याचा संकेत दिले आहे.
* विदेशी मुद्रा मध्ये सुधार झाले आहे.
* आत्मनिर्भर भारत 3.0 अंतर्गत नवीन घोषणा करण्याची वेळ आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close