महाराष्ट्र

एक गाव, एक दिवस’  महावितरणच्या सेवा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

  • सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांचे उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन  

औरंगाबाद —  महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील ग्रामीण भागात ‘एक गाव, एक दिवस’ आणि शहरी भागात ‘एक वार्ड एक दिवस’ उपक्रम राबवून  महावितरण कर्मचा—यांच्या पथकामार्फत  तेथील विजेच्या समस्यां जाणून घेवून त्याचे  निराकरण त्याच दिवशी करण्याचे निर्देश देवून  महावितरणची सेवा अधिकाधिक लोकभिमुख होण्यासाठी अभियंते व कर्मचा—यांनी या उपक्रमाची धडक  अंमलबजावणी करावी, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांनी केले आहे.

     मराठवाडयात ग्रामीण भागात एक गाव एक दिवस व शहर भागात एक वार्ड एक दिवस उपक्रम कोवीड 19 नियमाची काटेकोर पालन करून  येथील विजेच्या  समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ नरेश गिते यांनी औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, वित्त विभागातील कर्मचारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले.

     महावितरण कंपनी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत सर्व वीज ग्राहकांना केंद्रबिंदु समजून त्यांना दर्जेदार व सुरळित वीज पुरवठा करणे, वितरण प्रणालीची नियमितपणे देखभाल दुरूस्ती करणे, ग्राहकांना अचुक वीज देयके देणे व नियमितपणे भरणा करून घेणे, ग्राहक तक्रारीचे तात्काळ निरसण करणे, नवीन वीज पुरवठा देणे इत्यादी कामे करण्याकरिता शाखा अभियंता, उपविभागातील बिलिंग कर्मचारी व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी नियुक्त केलेले ठेकेदार यांनी एकाच दिवशी एका गावात वरील सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक यांनी दिले आहेत.
 
   या उपक्रमात  ग्रामीण भागातील उपविभागात गावाची निवड करून तपशिलवार नियोजन करण्यात येत आहे. शहरी भागात वार्डाची निवड करण्यात येत आहे.  या गावात महावितरणचे अभियंता, जनमित्र, वित्त विभागाचे कर्मचारी, कंत्राटदार यांचे पथक साधन साम्रगीसह पोहचत आहेत. येथील विजेच्या मुलभुत समस्या जाणून घेवून तेथेच या समस्याचे निराकरण करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने  लोबंकळणा—या तारा सरळ करणे, झुकलेले खांब सरळ करणे, वाहिन्यांवरील झाडांच्या फादया काढणे, वितरण रोहित्रांचे बॉक्स आणि केबल दुरूस्त करणे, नव्याने आर्थिंग करणे, गंजलेले खांब बदलणे, सिंगलफेजचे नादुरूस्त मिटर बदलणे, घरात असणारे वीज मीटर दाराबाहेर लावणे, चुकीचे वीज बिल दुरूस्त करणे, प्रलंबित नवीन वीज जोडणी देणे, एबी स्वीच बदलणे, रोहित्राभोवती असणारे गवत काढून स्वच्छ करणे, वीज चोरीचे आकडे काढणे आदी कामे करण्यात येणार आहे.तसेच वीज चोरीचे आकडे काढून विजेचा वापर करणा—यांची  ग्रामपंचायत कार्यालय नामफलकावर यादी लावून याची यादी पोलिस स्टेशन, तलाठी यांना देणे. एकदा सांगून पुन्हा वीज चोरी केल्यास गुन्हेही नोंद करण्यात येणार आहेत.   तसेच वीज अपघात टाळण्यासाठी लोकप्रबोधन करणे, आॅनलाईन वीज बिल भरणे, नवीन वीज जोडणीची मागणी करणे इत्यादी सुविधांची प्रात्यक्षिक मोबाईलवर  गावातील लोकांना करून दाखविणे. वीज बिल वसूल करणे.इत्यादी उपक्रम या गावात करण्यात येत आहेत.  

     रोहित्राच्या पालकत्व जबाबदारी  शेतक—यांची

 गावातील शेतीपंपांचे रोहित्र व त्या रोहित्रावर असणा—या अधिक्रत वीज जोडण्याचे शेतकरी याची यादी रोहित्रावर चिकटविणे, या रोहित्रावर अनधिक्रत असलेले आकडे काढणे, या आकडयामुळे रोहित्रावर अधिक भार घेवून रोहित्र  नादुरूस्त होतात.  त्यासाठी या रोहित्रावरील अनधिक्रत आकडे काढण्यासाठी शेतक—यांना सांगून रोहित्राची मालकी आणि पालकत्व शेतक—यांना प्रदान करून आपल्या रोहित्राची आपणच काळजी घेतल्यास अति भाराने रोहित्र जळणार नाही. यामुळे नवीन रोहित्र येई पर्यंत विजेपासून वंचित राहावे लागणार नाही.याची काळजी घेण्याबाबत लोकप्रबोधन करून जाणीव जाग्रती करण्यात येत आहे.

आमच्या गावात पथक कधी येणार याची गांवक—यात उत्सुकता शिगेंला 

महावितरणचे एक गाव एक दिवस उपक्रमाचे पथक आल्याने तालुक्यातील या गावाचे विजेचे प्रश्न, समस्या निकाली निघत असल्याचे माध्यमातून, गावक—यांतून ऐकावयास मिळत आहेत. असे महावितरणचे पथक आमच्या गावात कधी येणार आहे. याची उत्सुकता दुस—या गावातील गावक—यांना लागली असून तशी विचारण महावितरणकडे होत आहे. रोहित्रासंबंधी कोणतेही अडचण असल्यास संबंधित जनमित्रास त्याबाबत पालकत्व असणा—या व्यक्तिने अवगत करणे. 
 
    वीज समस्यासाठी मोबाईल क्रंमाक व टोलफ्री क्रंमाक 

     लाईनमन व अभियंता यांचे मोबाईल क्रंमाक गावातील लोकांना देवून वाटसअप ग्रुपवर क्रियाशिल राहून लोकांच्या विजेच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. तसेच गावातील विजेच्या समस्यासाठी मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचा टोल फ्रि क्रंमाक 18002333435 / 18001023435 / 1912 ही देण्यात येत आहेत. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close