देश विदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडन यांचा नागपुरशी रक्तसंबंध

नागपूर — अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बाईडन यांचे भारतीय कनेक्शन उघड झाले आहे. बाईडन यांचे काही नातेवाईक नागपूर मध्ये राहत असून स्वतः बाईडन यांनी भारतात आल्यानंतर एकदा खुलासा केला होता.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे लेस्ली बाईडन जो बाईडन यांना पत्र लिहिलं होतं. त्यांची नातवंडं नागपूर येथे राहत आहेत.,1873 पासून आपण भारतात राहत असल्याचा दावा त्यांनी यात केला आहे. लेस्ली या माणसोपचार तज्ञ होत्या बाईडन यांनी निवडणुकीत चांगले यश मिळवल असल्याच लेस्ली यांची नात सोनिया बाईडन फ्रान्सिस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. 1983मध्ये लेस्ली यांचं निधन झालं. त्या नागपुरातील भारत लॉज अँड हॉस्टेल आणि भारत कॅफेच्या त्या संचालक होत्या. 28 मार्च 1981चा ‘इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’चा अंक वाचत असताना लेस्ली यांनी तत्कालीन अमेरिकन सीनेटर जो बायडन त्यांचे नातेवाईक असल्याचा उल्लेख केला होता, असं सोनिया यांनी सांगितलं.
आम्ही बायडन यांचे नातेवाईक आहोत, असा दावा नागपूरमध्ये राहणाऱ्या काही लोकांनी केला आहे. बायडन यांचे हे नातेवाईक हे 1873 पासून नागपूरमध्ये राहत आहेत. 2013मध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना जो बायडन जेव्हा भारतात आले तेव्हा मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी त्यांचे काही नातेवाईक भारतात राहत असल्याचं म्हटलं होतं.
2013मध्ये मुंबईत आणि 2015मध्ये वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात बायडन यांनी भाषण करताना हा खुलासा केला होता. 1972मध्ये सीनेटर बनल्यानंतर मला भारतातून एक पत्रं आलं होतं. त्यात माझे महान आजोबा ईस्ट इंडिया कंपनीत काम करत होते, असा उल्लेख होता, असं बायडन यांनी सांगितलं.

लेस्ली यांनी 15 एप्रिल 1981मध्ये एक पत्र पाठवून बायडन यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर 30 मे 1981 रोजी बायडन यांनीही लेस्ली यांना उत्तर दिलं होतं. भारतातून पत्रं मिळाल्यानंतर बायडन आनंदित झाले होते. या पत्रातून त्यांनी बायडन कुटुंबाच्या वंशावळीचीही चर्चा केली होती, असंही सोनिया यांनी सांगितलं.
सोनिया यांचे मोठे बंधू इयान बायडन (वय 44) हे नागपूरमध्येच राहत आहेत. ते मर्चंट नेव्हीतील माजी अधिकारी आहेत. लेस्ली आणि जो बायडन यांच्यात आमचे पूर्वज जॉन बायडन आणि त्यांची पत्नी अॅनी ब्यूमोंट यांच्याबाबत चर्चा केली होती, असं इयान यांनी सांगितलं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close