क्राईम

शेतीच्या बांधावरून वाद; रक्तदाब वाढल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू, गुन्हा दाखल

नेकनूर — शेतीच्या बांधावरून एका 65 वर्षीय वृद्धास मारहाण करण्यात आल्यानंतर या वृद्धाचा बीपी हाय झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना कळसंबर वडगाव येथे घडली . या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी लावून धरली होती . या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला .
कळसंबर वडगाव येथील
रामचंद्र खामकर आणि सर्जेराव सिरसट यांच्यामध्ये शेतीच्या बांधावरून मंगळवारी विवाद निर्माण झाला होता . यावेळी रामचंद्र खामकर व जनाबाई खामकर या दोघांनी सर्जेराव शिरसाट यांना मारहाण केली . मारहाणीनंतर सर्जेराव यांचा बीपी हाय झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला . जोपर्यंत आरोपीविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही , असा आक्रमक पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता . त्यानुसार फिर्यादी सुभाष सर्जेराव सिरसट यांच्या फिर्यादीवरुन आरोपी रामचंद्र खामकर व जनाबाई खामकर यांच्याविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात कलम ३०४ , ३२३ , ५०४ , ५०६ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर पोलिस करत आहेत .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close