महाराष्ट्र

मोदीजी ‘ ना खाऊंगा ना खाने दुंगा’वचन खरं केलत यंत्रणेमार्फत खानावळी वाल्यालाच उपाशी मारलत

बीड — मोदी साहेब विधानसभा निवडणुकीच्या काळात तुमच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना ज्या खानावळीवाल्याने खाऊ घातले त्याचे बिल अद्याप दिलेच नाही. ना खाऊंगा ना खाने दुंगा हे तुमचे वचन प्रशासनाने खरे करत या कुटुंबावर खरोखरच उपासमारीची वेळ आणली. मोठ्याचा गाडा आला गरिबांचे संसार मोडा या म्हणीचा प्रत्यय या कुटुंबाला आला आहे.

—————————————————–

मिळाली फक्त आश्वासन.. तर आत्महत्या
आम्ही उध्वस्त होत आहोत खायचे वांदे झाले आहेत देणेकरी दारात येऊन बसत आहेत. त्यामुळे लवकर बिल काढण्यात यावे अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर विजय कबाडे उपअधीक्षक राहुल धस, स्वप्निल राठोड हेमंत कदम यांच्याकडे केली होती मात्र यांच्याकडून बिल चार दिवसात आठ दिवसात निघेल अशी फक्त आश्वासनच मिळाली.आठ दिवसात बिल न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्महत्या करण्याचा इशारा संजय स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे ‌.

—————————————————-

उरलंसुरलं कोरानाने हे कुटुंब आणखी उध्वस्त केलं. आपल्या यंत्रणेने फकीर केलेलं हे दांपत्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसल आहे. आता मन की बात मधून यावरही भाष्य करा असं परळीकर म्हणू लागले आहेत.
परळी येथे विधानसभा निवडणूक काळात मोदींची सभा पार पडली. या सभेमधून मोदींनी आश्‍वासनांची खैरात ही वाटली. पण ही शब्दांची खैरात वाटत असताना दुसरीकडे त्यांच्या बंदोबस्ताला लावलेल्या पोलिसांच्या फौज फाट्याला खाऊ घातलेल्या गुरुकृपा नामक परळीच्या खानावळीच्या मालकाला तुमच्या व्यवस्थेने उद्ध्वस्त केल्याचे दिसून आले. संजय रामलिंग स्वामी राहणार विद्यानगर परळी यांच्या मालकीच्या खानावळीचे तब्बल 2 लाख 62 हजार रुपयाचे बिल थकवले. हे बिल मिळावे यासाठी मेस चालकाने पोलीस अधिक्षक कार्यालयाचे जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवले. जवळ होते नव्हते तेवढे भांडवल व बाजारात निर्माण केलेली पत पणाला लावून ‘अच्छे दिन’ येतील या आशेवर उसनवारी करत पोलीस यंत्रणेला त्यांनी 15 ते 20 ऑक्टोबर 2019 या काळात खाऊ घातले. जवळचे भांडवल संपले बाजारातली पत गेली देणे करी दारात घेऊन बसू लागले. परिणामी उध्वस्त झालेल हे कुटुंब पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवताना होणाऱ्या खर्चासाठी मेस चालकाच्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले. उण्याला पुरवठा म्हणून पुन्हा लाॅक डाऊन सारखं संकट उरलेसुरले उध्वस्त करायला धावून आलं. खायचे वांदे झाले जगाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही तरीही निगरगट्ट प्रशासनाला घाम फुटला नाही. आंदोलनाचे इशारे दिल्यामूळे माध्यमांनी याची दखल घेऊन सूद्धा या कुटुंबाची आर्त हाक मोदींच्या कानापर्यंत तर पोहोचलीच नाही. किमान ‘मन की बात’कार्यक्रमातून सुद्धा त्यांनी या कुटुंबाच्या दयनीय परिस्थितीची दखल घेतली नाही. यथा राजा तथा प्रजा या म्हणीचा प्रत्यय मोदींच्या यंत्रणेने देखील नुसती आश्वासनांची खैरात फकीर झालेल्या या कुटुंबाच्या झोळीत टाकली. परिणामी हे कुटुंब पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आता आमरण उपोषणाला बसल आहे. किमान आतातरी पोलीस यंत्रणा याची दखल घेईल काय? मोदी मन की बात मधून त्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न करतील काय असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close