महाराष्ट्र

यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत

 मुंबई – राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता 7 डिसेंबर पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे असा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला.

मुंबईतील विधान भवनामध्ये दोन्ही सभागृहांच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली यामध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत असते मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच 7 डिसेंबर ला हे अधिवेशन सुरू करता येईल का व ते किती दिवसाचे असेल यावर नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच झालेल्या बैठकीत अधिवेशनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन घेणे हितावह ठरणार नसल्याच्या सूचना यावेळी केल्या होत्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close