महाराष्ट्र

बीडचे केशर दुग्धजन्य उत्पादन पुणेकरांच्या सेवेत

पुणे — उत्तम नोकरी कनिष्ठ व्यापार आणि शेवटी शेती अशी आजपर्यंतची पद्धत असली तरी या काळात अनेक तरुणांनी व्यापारात उतरून स्वतःचे कर्तत्व सिद्ध करून दाखवले आहे व्यापारामध्ये मेहनत गुणवत्ता दर्जा किंमत आणि योग्य सेवा दिली तर कुठल्याही बाजारात घवघवीत यश मिळते पुणेकरांनी एखाद्या उत्पादनाला पसंती दिली तर ती देशभरात आणि जगभरात नावाजली जाते असा अनुभव असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

बीड तालुका व्यवसायिक सहकारी संस्था संघ मर्यादित बीड च्या वतीने पुणे येथे राजनंदिनी दूध एजन्सी याठिकाणी केशर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी वडगाव शेरीचे आ सुनील टिंगरे,जि प सदस्य ज्ञानेश्वर खटके,वाघोलीच्या सरपंच वसुंधराताई उबाळे,लोहगाव च्या सरपंच श्वेताताई काळे,ग्रा प सदस्य वनिता अरुण जगताप, रामदास काळे शिवदास उबाळे मा जि प सदस्य प्रताप दादा खांडवे, रामभाऊ दाभाडे शिवदास उबाळे, कार्यकारी संचालक संतोष श्रीखंडे उद्योजक अजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राजनंदिनी चे संचालक महेश जगताप व कुटुंबियांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की बीड सारख्या ठिकाणी दूध संघाच्या माध्यमातून केशर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आता संपूर्ण राज्यभरात वितरीत होत आहे पुणे परिसरात आता सहा एजन्सीच्या माध्यमातून या उत्पादनाची विक्री सुरू करण्यात आली आहे पुणेकरांनी एखाद्या उत्पादनाला पसंती दिली तर ते उत्पादन देशभरात नावाजले जाते नेहमीच उत्तम नोकरी कनिष्ठ व्यापार आणि शेवटी शेतीला प्राधान्य दिले जाते मात्र आता बदलत्या काळात तरुणांनी व्यापारात उतरून यशाकडे जाण्याचा मार्ग निवडला आहे मेहनत गुणवत्ता दर्जा किंमत आणि योग्य सेवा राखली तर कुठल्याही बाजारात यश मिळणे अवघड नाही उत्पादित होणारे पदार्थ गुणवत्ता टिकून ठेवले तर ग्राहकांची चांगली पसंती मिळते त्यामुळे दर्जेदार दर्जेदार उत्पादन आवश्यक आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना आता चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे दूध संघात संकलित होणारे दूध हे परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून होते या दुधापासूनच अनेक उत्पादने आता बाजारात बाजारात येऊ लागले आहेत बीड जिल्ह्यात मराठवाड्यात आणि आता महाराष्ट्रात या उत्पादनाला चांगली मागणी येऊ लागली आहे असे सांगून त्यांनी संचालक जगताप परिवाराला शुभेच्छा दिल्या यावेळी धनंजय जगताप व ग्राहक उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close