महाराष्ट्र

बीडच्या एस.टी.चालकाची रत्नागिरीत आत्महत्या ;कर्मचार्‍यांचे आक्रोश आंदोलन

मुंबई  — महाराष्ट्रातील एस.टी.कर्मचार्‍यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिवाळीसारखा महत्त्वाचा उत्सव तोंडावर असताना घरी पगारच येत नसल्याने कर्मचार्‍यांवर रस्त्यावर यायची वेळ आली आहे. अशामध्ये रत्नागिरी एसटी डेपोतील चालक पांडुरंग गडदे यांची आत्महत्येची बातमी कळताच सर्व एस. टी. कर्मचार्‍यांनी आक्रोश आंदोलनला सुरुवात केली. दिवाळीपर्यंत कर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा करा, अशी मागणी एसटी कर्मचार्‍याकडून केली जात आहे. तसेच, प्रलंबित वेतनासाठी 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहे.
तसेच, जळगावच्या रायपुर कुसुंबा गावामध्येही मनोज चौधरी या एस. टी. कर्मचार्‍याने आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एस. टी. महामंडळ आणि ठाकरे सरकारचा उल्लेखही केला गेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दिवाळीपर्यंत कर्मचार्‍यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.
सध्या पांडुरंग गदडे यांचे नातेवाईक बीड येथून निघाले असून त्यानंतरच पोस्टमॉर्टम केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पांडुरंग गडदे यांचा आत्महत्या केल्यानंतरचा फोटो समोर आला आहे. यामध्ये त्यांच्या अंगावर कोणत्याही स्वरूपाचा कपडा नाही. विवस्त्र अवस्थेमध्ये लटकलेला मृतदेह लटकलेल्या स्वरूपामध्ये समोर आल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याची चर्चा सुरू आहे. दरम्यान ही आत्महत्या नसून त्याची हत्या असल्याचा आरोप पांडुरंग गडदेंच्या वडिलांनी केला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close