राजकीय

फुकटचे श्रेय घेण्यासाठी विकासात ‘सेल्फीचा फॉर्मुला’ — नगराध्यक्ष

बीड — बीडचं राजकारण कोणत्या पातळीवर जात आहे. अत्यंत शोकांतिका बीड शहरामध्ये निर्माण झाली आहे. ३५ वर्षे नगराध्यक्ष पदावर काम करताना अनेक विरोधक आले आणि गेले. अनेक विरोधक आमदारही होते पण त्यांनी विकास कामात मात्र कधी अडथळा आणण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. विरोध निवडणुकीपुरता मर्यादीत होता. अशा विरोधकांनी फुकटचे श्रेय घेण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. मात्र गेल्या दोन वर्षात बीडचे चित्र अत्यंत विचित्र निर्माण झाले आहे. भल्या पहाटे उठायचे, दोन चार सेल्फी काढायच्या, हे काम आम्हीच आणले, आम्ही करायला भाग पाडले, भ्रष्टाचार होत होता. तो आम्ही थोपवला अशी कारणी देवून शहरवासियांची दिशाभूल आणि डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे.

डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी असे म्हटले आहे की, गेल्या ३५ वर्षात विरोधकांनी निवडणुकापुरता विरोध केला. विकासाचे राजकारण कधी त्यांनी केले नाही, विकासामध्ये कधी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला नाही. ना कधी फुकटचे श्रेय घेतले. मात्र गेल्या दोन वर्षात बीडमध्ये विचित्र राजकारणाला सुरूवात झाली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीड शहरामध्ये तीन मोठ्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या. योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवातही झाली. या योजना राबवताना शहरातील मुख्य १८ रस्ते सिमेंट काँक्रीटने करण्याचा प्रकल्प सुरू झाला. या रस्त्याच्या कामात विरोधकांनी जाणुनबुजून कामे अडवून राजकारण करण्याचा प्रयत्न करत विकासकामे करणाराला बदनाम करण्याचे कारस्थान रचले आहे. सुरूवातीच्या पहिल्या टप्प्यात सुभाष रोड, माळीवेस, सटवाई मैदान रोड, शाहुनगरकडचा डि.पी.रोड ही कामे पूर्ण झाली. दुस-या टप्प्यात विकासकामे सुरू होत असताना विरोधकांनी स्टंटबाजी करायला सुरूवात केली. स्टंटबाजी करून विकासाचे श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न केला. बीडच्या ज्या व्यापा-यांनी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून कामे करून घेतली, त्या मोंढ्यातील व्यापा-यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या रस्त्यांचे का सुरू झाले की, कागदोपत्री तक्रारी करायच्या, कामे अडवण्याचा प्रयत्न करायचा, यात बीड शहरातील नागरिकांची ससेहोलपट झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्त्याचे काम सुरू होताच दडपशाही आणि धमक्या देवून काम थांबवण्यात आले आणि तेथील नागरिकांमध्ये विकास कामे करणा-यांच्या विरोधात गैरसमज निर्माण करून दिला. जेव्हा हे काम सुरू झाल्यानंतर हेच विरोधक पुन्हा सेल्फी काढत आपल्या रेट्यामुळे काम सुरू झाल्याचे सांगत आहेत. एवढेच नव्हे तर विरोधकांनी एक नविन फॉर्मुला अंमलात आणला आहे. ज्या कामाला सुरूवातच झाली नाही, काम पूर्ण व्हायचे आहे, काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणी करायची आहे. त्या आधीच विरोधक सोशल मीडियावर त्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आवई उठवत आहेत. आज जे विरोधक विकासकामामध्ये आडकाठी आणत आहेत. त्यांना आमच्यासोबत असताना संपूर्ण ग्रामिण भागाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली होती. तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी कोणते दिवे लावले ही विचारण्याची आता वेळ आली आहे,जी कामे जीवनप्राधिकरण मार्फत सुरू आहे ती कामे करून भ्रष्ट्राचार करत असल्याचा केविलवाणा आरोप आहे असेही आपल्या पत्रकात डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close