महाराष्ट्र

पंधरा दिवसात मराठवाडयात 3,561 दिल्या वीज  जोडण्या

औरंगाबाद — नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता व वीज शुल्काचा भरणा केलेल्या अर्जदारांना वीज जोडणी देण्यासाठी विलंंब झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा सहव्यवस्थापकीय संचालकांनी दिला होता. महावितरण कर्मचा—यांनी   औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलातील घरगुती, व्यापारी आणि औघोगिक प्रलंबित पंधरा दिवसात 3,561 नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत.

   मराठवाडयात घरगुती, व्यापारी व औघोगिक प्रलंबित  वीज जोडण्या देण्यासाठी पायाभुत सुविधा उपलब्ध असतानाही   विलंब केल्यास   शाखा अभियंता, सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांची  जबाबदारी  निश्चित करून संबंधितांवर  कारवाई करण्याचे निर्देश महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी व्हीडीओ कॉन्फर्सिंगद्वारे दि. 15 आॅक्टोंबर 2020 रोजीच्या आढावा बैठक  दिले होते.
   
    औरंगाबाद परिमंडलात 1,309 नवीन वीज जोडण्या दिल्या. नांदेड परिमंडलात 642 नवीन वीज जोडण्या दिल्या. तर लातूर परिमंडलात 1,610 नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. असे एकूण  मराठवाडयात 3,561 नवीन प्रलंबित वीज जोडण्या दिल्या आहेत. 

परिमंडल          नवीन वीज जोडण्या  
औरंगाबाद          1,309
नांदेड              642
लातूर             1,610
एकूण             3,561

     महावितरणने साधनसामग्रीच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया ईआरपीच्या अर्थात इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग माध्यमातून  यापूर्वीच आॅनलाईन केली आहे. त्यामुळे मीटरची उपलब्धता व पुरवठा प्रक्रिया पारदर्शक व गतिमान बनली आहे. प्रलंबित अर्जदारांना वीज जोडणी देउन ईआरपी प्रणालीत त्याची नोंद करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना  दिल्या आहेत. नवीन  वीज जोडणीसाठी अर्जदारांनी त्रयस्त किंवा मध्यस्थांशी संपर्क साधू नये.     महावितरणच्या   www.mahadiscom.in     या संकेतस्थळावर  तसेच मोबाईल अॅपद्वारे नवीन वीज जोडणीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता व वीज शुल्काचा भरणा केलेल्या निकषातील पात्र अर्जदारांनी नवीन वीज जोडणी मिळाली नसेल तर जवळच्या शाखा कार्यालय, उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close