महाराष्ट्र

अजमल कसाबच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडलेले बीड कारागृह अधीक्षक कांबळे यांचे निधन

बीड — -26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख अतिरेकी अजमल कसाब याच्या सुरक्षेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेले व बीडच्या जिल्‍हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.
कोरोना वर उपचार घेतल्यानंतर मंगळवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपल्या कामाची ओळख निर्माण करणारे बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना कोरूना ची लागण झाली होती. त्यांच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. मूळचे शिक्षक असलेले कांबळे यांनी कारागृह अधीक्षक म्हणून काम पाहत असताना कैद्यांची मानसिकता बदलण्याचे मोलाचे काम केले होते. तिहार जेलची जबाबदारी पार पाडत असताना 26 /11 हल्ल्याच्या वेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब च्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close