ब्रेकिंग

रिपब्लिक भारत चा संपादक अर्णव गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई — अलिबाग येथील इंटिरियर डिझायनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी नमूद केले होते. या प्रकरणी आज सकाळी रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी अर्णब गोस्वामी यांना पोलीस पकडून घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावले. अर्णब गोस्वामी म्हणाले की, मला औषधेही घेऊन दिली नाहीत, मला पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचा आरोप अर्णबने केला.
कलम ३०६ च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असल्याची माहिती आहे.
अस आहे प्रकरण !

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close