आपला जिल्हा

उस्मानाबादच्या एलसीबीनं साडेबारा लाखाचा 62 किलो गांजा पकडला

तुळजापूर — शहर व परिसरातून अवैध गांजाची वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच वेगाने हालचाली करत लावलेल्या सापळ्यात दोन नोव्हेंबर च्या मध्यरात्री गांजा घेऊन जाणारा मिनी ट्रक पकडला. यात 12 लाख 40 हजार रुपये किमतीचा 62 किलो गांजा जप्त करण्यात आला.

तुळजापूर- नळदुर्ग रस्त्यालगत असलेल्या लोकमंगल पेट्रोल पंपाजवळ 2 नोव्हेंबर रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय सापळा लावला. या सापळ्या दरम्यान पेट्रोल पंपाच्या दक्षीणे बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ एक मिनीट्रक क्र. के.ए. 39-8859 हा संशयीत रितीने उभा असलेला आढळला. पोलीसांनी त्या मिनीट्रकची झडती घेतली असता मिनीट्रक मधील विजयकुमार श्रावण मदनुरे, रा. दागडी, ता. भालकी, जि. बिदर, राज्य- कर्नाटक याने 3 पोत्यांत प्रत्येकी 10 गांजा पुडे असा एकुण 62.04 कि.ग्रॅ. गांजा अंमली पदार्थ अवैधपणे बाळगुन लपवून ठेवला असल्याचे आढळले. पथकाने विजयकुमार मदनुरे यास ताब्यात घेउन नमूद गांजा व मिनीट्रक, मोबाईल फोन जप्त केला.

स्था.गु.शा. च्या पोउपनि- पांडुरंग माने यांना मिळाली होती. यावरुन मा. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक, संदीप पालवे स्था.गु.शा. चे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या पोउपनि पांडुरंग माने, पोहेकॉ प्रमोद थोरात, पोना हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ आरसेवाड, अविनाश मरलापल्ले यांसह तुळजापूर पो.ठा. चे पोनि- मनोजकुमार राठोड, सपोनि- गणपत राठोड, पोउपनि- चनशेट्टी यांचे पथक व नायब तहसीलदार- चंद्रकांत शिंदे यांच्यासह दोन शासकीय पंचांच्या मदतीने पोलीस पथकाने हा सापळा लावला होता.पो.काॅ.प्रमोद थोरात यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात एन डी पी एस कायदा कलम 20 (ब)(ii)(c), 29 अन्वये 3 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close