आपला जिल्हा

बीडमधील रखडलेल्या कामाने घेतली गती 6 महिन्यात अनेक योजना होणार पूर्ण

बीड — बीड शहराच्या विकासात भर घालणा-या तीन मोठ्या योजना खेचून आणण्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांना यश आले. निधीही उपलब्ध झाला. प्रत्यक्ष कामाला थोडी उशिरा सुरूवात झाली असली तरी शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. एकीकडे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर योजना खेचून आणत आहेत. बीड शहराचा चेहरा मोहरा बदलत आहे. तर दुसरीकडे योजना राबवताना विरोधक आडकाठीची भूमिका घेत आहेत. कामे अडवत आहेत. हे बीड शहरासाठी, बीड शहरातील जनतेसाठी वेदनादायी आहे.

बीड शहरामध्ये रस्ता आणि भूमिगत गटार योजना आणि योजनेची कामे काही दिवसापासून सुरू आहेत. ही सर्व कामे जीवन प्राधिकरणकडून केली जात आहेत. कामे करताना ठिकठिकाणचे रस्ते खोदून ठेवल्याने त्याचा त्रास नागरिकांना आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कामाच्या होणा-या दिरंगाईकडे शहरवासिय संतापत आहेत. ही कामे तातडीने मार्गी लावावीत यासाठी नगरपालिका सतत पाठपुरावा करत आहे. एवढेच नव्हे आंदोलनाची भूमिकाही घेत आहेत. त्याच पाठपुराव्यामुळे शहरातील सर्वच भागातील रखडलेली कामे तातडीने सुरू होत आहे. जी कामे नगरपालिकेच्या अख्यारित आहेत ती होणारच आहेत मात्र शहरातील काही भागामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे केली जात आहेत. ती कामे अर्धवट अवस्थेत आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे. अर्धवट राहिलेली कामे नगरपालिकेची असल्याची दिशाभूल आणि संभ्रम विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान अमृत अटल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजना आणि मलनिस्सारण प्रकल्पाची कामे करणा-या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदारांकडून वेळेत काम पूर्ण न झाल्याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी तक्रार नगर पालिका प्रशासन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.एवढेच नव्हे तर शहर पोलीस ठाण्यातही याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे ज्या भागामध्ये नगरपालिका काम करत आहेत त्या भागात खोटा प्रचार करून कामात अडथळा आणणा-या विरोधकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.कामे सुरू असताना जर कुणी अडथळा आणत असेल तर सुजाण नागरिकांनी याबाबत तातडीने तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close