आपला जिल्हा

मी आयुक्तांचा माणूस जिल्हाधिकारी माझं वाकड काय करणार — ठाणगे

बीड — बीडच्या तालुका पुरवठा विभागात खुर्ची उबवत बसलेला रवी ठाणगे नामक व्यक्ती सध्या कुठलाही पदभार नसताना धसकट पणाने कारभार हाकण्याच काम करत आहे. स्वतः किती ग्रेट आहोत हे सांगताना मी आयुक्तांचा माणूस आहे जिल्हाधिकारी माझं काय वाकडं काय करणार ? असं महिमा मंडन करत कार्यालयात येणाऱ्या लोकांना वेठीस धरण्याचं काम करत आहे.
प्रसिद्धीमाध्यमांनी रवि ठाणगे च्या मग्रूर व लुच्चेगिरी च्या स्वभावामुळे मध्यंतरी रान उठवल्यानंतर एक महिन्याच्या रजेवर निघून गेला. मात्र या कालावधीमध्ये सध्या कोरोना संकट काळात कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी गोदाम रक्षक पद असो की अन्य पद असो यावर इतर लोकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र सध्या कुठल्याही पदाचा कारभार या ठाणगेकड राहिला नाही. अस असलं तरी “खायला काळ भुईला भार ” अशी स्थिती सध्या बनली आहे. रुजू होताच पुन्हा पूर्वीचा तोरा मिरवण्याच काम त्याने सुरू केलं. कार्यालयात तालुक्यातून येणाऱ्या लोकांना अरेरावीच्या भाषे बरोबरच त्यांचं आर्थिक मानसिक शोषण करण्याचे काम केलं जाऊ लागलं आहे. प्रसिद्धी माध्यमातून त्याच्या कारभाराला वाचा फोडली गेल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तो मी आयुक्तांनी नियुक्त केलेला माणूस आहे मग जिल्हाधिकारी माझं काय वाकडं करणार त्यांना माझ्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नसल्याचं सांगत स्वतःचे महत्त्व वाढवून घेत स्वतःची तुंबडी भरून घेण्याच काम तो करत आहे. महसूल प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांवर सर्व मदार अवलंबून आहे अशा स्थितीत कुठलाही पदभार नसताना ठाणगे पुरवठा विभागात करतो तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आशा मग्रूर लोकांची लूटमार करत मानसिक त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून कधी सुटका होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
नायब तहसीलदार करतात तरी काय?
ठाणगे सारख्या माणसाचा पुरवठा विभागाशी संबंध नसताना तो या कार्यालयात येऊन बसतो कसा? इथला कारभार हाकतो कसा ? या कार्यालयात येणाऱ्या लोकांची लूट का होऊ देतात ? ते त्यांच्या अधिकाराचा वापर करत त्याला त्याची लायकी का दाखवत नाहीत असे प्रश्न विचारले जात आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close