राजकीय

शरद पवारांची मोठी खेळी, गोव्यात भाजपला हादरा देण्याची तयारी

गोवा – महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीने एकत्र येत महा विकास आघाडी सरकार स्थापन केले याच धर्तीवर गोव्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला धक्का देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लवकरच ही राजकीय खेळी शरद पवार प्रत्यक्षात उतरवतील अशी चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे आपल्या कुटुंबासह गोव्यामध्ये खाजगी दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत.या दौऱ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत काँग्रेस नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेत त्यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेतील तपशील बाहेर आला नसला तरी महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजपविरोधी मोट शरद पवार बांधू शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जाऊ लागला आहे.या भेटीचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
सध्या गोवा विधानसभेत भाजपची सत्ता असून एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. 2017 मध्ये भाजपने याठिकाणी 13 जागा जिंकून गोवा फॉरवर्ड पक्ष तीन राष्ट्रवादी गोमंतक पक्ष तीन आणि तिन अपक्ष आमदारांच्या मदतीने सरकार बनवले होते. येणाऱ्या काळात भाजप आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टीच्या दोन आमदारांना पक्षात घेतले. तसेच 17 जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या असताना 14 आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला. नंतरच्या काळात भाजपने गोवा फॉरवर्ड पक्ष तसेच महाराष्ट्र वादी गोमंतक पार्टी व दोन अपक्षांना सत्तेच्या बाहेर हाकलले. गोवा भाजपमध्ये सध्या स्वतःच्या आमदार पेक्षा बाहेरून आलेल्या आमदारांची संख्या अधिक आहे .ती 27 इतकी मोठी आहे. काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेला मोठा गटाला आपलंसं करण्यात विरोधी पक्षाला यश आल्यास गोव्यात राजकीय समीकरण बदलत सत्तांतर होऊ शकते.

गोवा विधानसभेतील पक्षीय बलाबल

सत्ताधारी- 28
भाजप – 27,
अपक्ष 1
एकूण- 28
यामध्ये 28 पैकी काँग्रेसचे 13 आणि 2 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांनी भाजपला जवळ केले आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये सामील झालेल्या आमदारांची संख्या पंधरा आहे.
विरोधी पक्ष एकूण – 12
काँग्रेस – 5,
मगो पक्ष – 1,
गोवा फॉरवर्ड पक्ष – 3,
राष्ट्रवादी -1,
अपक्ष 2, –
एकूण 12
असे पक्षीय बलाबल आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close