क्राईम

एसपींच्या मार्गदर्शनाखाली भूतेकरांच्या पिंपळनेर ची मिनी बिहार कडे वाटचाल

बीड — गुन्हेगारी जगतामध्ये आवर्जून 3 बी चा उल्लेख केला जातो यामध्ये बॉम्बे बिहार आणि बीड यांचा समावेश होतो. याच बीडला लाभलेले पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांचा कारभार रामभरोसे असल्यामुळे बीडची विशेषतः भूतेकरांच्या पिंपळनेर ची मिनी बिहार कडे पुन्हा एकदा वाटचाल सुरू झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

धनु भाऊ पालकमंत्री म्हणून आपलं लक्ष कायदा सुव्यवस्थे कडे सुद्धा असणं गरजेच आहे. यापूर्वी गुन्हेगारांना पालकमंत्र्यांनी राजरोस पाठीशी घातलं तशी अपेक्षा किमान आपल्याकडून तरी नाही कारण आपण तावून सुलाखून विश्वास निर्माण करत यश मिळवलं आहे. ते कदाचित दुर्लक्ष केल्यामुळे माती मोल होऊ शकतं हे विसरून कसं चालेल ?

एसपींच्या बुडा शेजारी असलेल्या घरांमध्ये चोरी होते. साळेगाव सारख्या ठिकाणी सामूहिक बलात्कार होतो सोबतच हत्या केली जाते. तर पिंपळनेर सारख्या भागामध्ये अवैध धंदे इतके जोमात आहेत की जनतेला संविधानाने दिलेल्या अधिकारावर देखील गदा आली आहे. तोंडातून ब्र शब्द काढताच धमक्या देणारे व दहशत निर्माण करणारे बांडगुळ भुतेकरांनी पाळली आहेत याला आळा कधी बसणार असा प्रश्न विचारला जात आहे?
पोलीस अधीक्षक राजाराम स्वामी यांनी बीडमध्ये पदभार स्वीकारताच दुकानावर दरोडा टाकून चोरांनी सलामी दिली. दोन-तीन दिवस उलटत नाहीत तोच त्यांच्या निवासस्थानी शेजारी असलेल्या घरांमध्ये घरफोडी झाली. गुन्ह्यांच्या तपासामध्ये एवढी ढिलाई आली की तपास लागायला तयारच नाही. जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना शहरी भागात घडणारे बलात्कार खूनासारख्या गुन्ह्यांचं लोन ग्रामीण भागात देखील पोहोचल आहे. पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिला जात असल्याचा आरोप पोलीस अधीक्षकांवर जनतेतून होत असला तरी याच सोयर-सुतक रामा स्वामींना नसल्याचं पहावयास मिळत आहे.चोऱ्यांची आकडेवारी पाहिली तर 470 पैकी 166, घरफोडी 147 पैकी 23 दरोडा मध्ये 34 पैकी 14 गुन्ह्यांचा तपास लागला आहे बाकी रामभरोसे सुरु आहे. गुटखा,दारू हातभट्टी,वाळू तस्करी राजरोस सुरू आहे. हप्ते वसुलीला देखील पोलिसांनी सूरूवात करत ” स्वामी ” आश्रय मिळवून देण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यात हे सर्व चालू असले तरी याचा सर्व सामान्य नागरिकांना फारसा त्रास होत नाही मात्र पिंपळनेर भागामध्ये भुतेकरांच्या पिलावळीनी यावर कळस चढवला आहे. संविधानाने जनतेला स्वातंत्र्य दिलं असलं तरी विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला कसं चिरडायचं हे जनरल डायर च्या या वंशजाला ? मात्र पूरत माहीत आहे. सोशल माध्यमावर एखाद्याने येथे सुरू असलेल्या अवैध धंद्याची साधी पोस्ट जरी केली तरी जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्याचे काम भुतेकर यांनी जमवलेली भुतावळ करत असल्याच पाहावयास मिळत आहे. अवैध धंद्याची तक्रार दिल्यानंतर तर दारुडे अंगावर सोडणे ,महिलांना अंगावर घालने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे वेळप्रसंगी मारहाण करणे या सारख्या गोष्टी पिंपळनेर परिसरात शुल्लक झाल्यामुळे चांगल्या माणसाचे जीवन जगणे या ठिकाणी अवघड होऊन बसलं आहे. एकंदरीतच बिहार सारखी परिस्थिती पिंपळनेर ची आज झालेली असली तरी बीड जिल्ह्याची व्हायला वेळ लागणार नसल्याच मत सर्वसामान्य व्यक्त करू लागले आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close