आपला जिल्हा

राजापूर येथे रस्त्यावरील पुलासाठी महिलांचे लहान मुलांसोबत जल आंदोलन

गेवराई — तालुक्यातील राजापूर आडगाव येथील दोन तर काठोडा येथील रस्त्यावरील एका पुलाचे काम अर्धवट व बोगस झाल्यामुळे याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे परिणामी ग्रामस्थांना चप्पू चा वापर करावा लागत आहे. वारंवार पूलाची मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे सोमवारी महिलांनी आबालवृद्धांसह नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले

गोदावरी काठी असलेल्या राजापूर येथे आजही गावातून शेतात जायला पूल नाही. परिणामी येथील नागरिकांना चप्पूवरूनच प्रवास करावा लागतो. दरम्यान, शेती करणेही अवघड झाल्याने येथील महिलांनी पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले. यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
गोदावरी नदीवर बंधारा भरल्यानंतर ओढे, नाले याद्वारे येणाऱ्या पाण्यामुळे या गावातील जवळपास चार रस्ते पाण्याखाली जातात. या रस्त्यापैकी दोन पुलाचे काम अर्धवट तर एक पुल पूर्वीच पाण्याने वाहून गेला. राजापुर तलवाडा रस्त्यावरील गट.क्र.२५० जवळ पुल आवश्यक असताना तो बांधण्यात न आल्याने राजापुर येथील हजारो एकर क्षेञातील शेतीला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या शेतीचे नुकसान होत आहे. शेतमाल, खते, बियाणांची ने-आण करण्यासाठी अडचण झाल्यामुळे झाल्यामुळे शेती पडीक पडण्याच्या मार्गावर आहे. वारंवार मागणी करुनही पुल होत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
महिलांनी घेतले लेखी आश्वासन
महीलांच्या या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. यावेळी महिलांनी ठोस व लेखी निर्णय आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर नांदुर मधमेश्वर कालवा ऊपविभाग क्र ९ चे ऊपविभागीय अभियंता संदिप पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर महिला पाण्याच्या बाहेर आल्या.

प्रशासनाला तळ ठोकावा लागला
महिला पाण्यात उतरल्यामुळे तलवाडा पो.ठाण्याचे स.पो.नि.सुरेश उनवणे हे सहकाऱ्यांसह बंदोबस्त ठेवून होते. महसुलकडून तलाठी अनिल गायकवाड, नां.म.का.चे वहाब शेख, आरोग्य प्रशासन तळ ठोकुन होते. पोलिसांनी बंदोबस्त ठेवून व्यवस्थितपणे काळजी घेतली. यावेळी लहान मुलांवर त्यांचे लक्ष होते.

महिलांनी केले आंदोलनाचे नेतृत्व

या आंदोलनात गावातील महानंदा औंढकर, अनिता बेडके, कविता बेडके, गंगा बागल, पठाण गूलशन, सीता पवार, कविता बेडके, संगिता बेडके, गंगा ऊबाळे राजेश राजगुरु, किसन बेडके, पंडीत औंढकर, प्रल्हाद बेडके, गोपाल, दगडुराम बेडके यांच्यासह गावातील महिलांसह पुरुषांनीही सहभाग घेतला.

अधिकार्‍यांना देखील उतरावे लागले पाण्यात

लेखी आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यासाठी निवेदन स्वीकारण्यासाठी जलसंपदाच्या प्रतिनिधीसही महिलांनी पाण्यात ऊतरावयाला सांगून निवेदन स्वीकारले. आठ दिवसांत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन अंमलबजावणी न केल्यास परत आंदोलन करण्याच्या अटीवर माघार घेतली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close