कृषीवार्ता

शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बोंबा मारो आंदोलन

बीड — अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुरा कोलमडला आहे या परिस्थितीत त्याला विम्याचा हातभार लागला तर आर्थिक विवंचनेतून बाहेर यायला मदत मिळेल.या अनुषंगाने आज प्रातिनिधिक तत्वावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली विविध ग्रामपंचायतीसमोर बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.


नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला करे वाफून आले. सोयाबीनची काढणी ज्या शेतकऱ्यांनी केली होती त्यांच्या ढिगाऱ्याखाली पाणी साचल्यामुळे कापसाच्या वाती झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कोरोना संकटकाळात शेती व्यवसाय उध्वस्त झाला अशा स्थितीत शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे ‌ अशावेळी पिक विमा कंपनीने तात्काळ नुकसानीची पाहणी करून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती द्यावी. अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली होती. इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांचे कानावर शेतकऱ्यांचा आक्रोश जावा यासाठी 1 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती समोर बोंबा मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

या अनुषंगाने आज
मौजे मादळमोही,धोंडराई ,आनंदगाव,देकणमोहा,साळेगाव,
नि.टाकळी ,शिंपीटाकळी,भटवडगाव ,
वरपगाव येथे आणि कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील बाकी ठिकाणी डिजिटल पध्दतीने निवेदन पाठवून शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांचा रोष व परिस्थिती संबंधित विमा कंपनीला कळवावी जेणेकरून कंपनी लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत पोचेल असे आवाहन अधिकाऱ्यांना भाई गंगाभीषण थावरे यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close