राजकीय

खडसेंना आमदार करू नये अंजली दमानियांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई — जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असून भाजपा सोडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करू नये अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे अंजली दमानिया यांनी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच अंजली दमानिया यांच्यावर तोंडसुख घेतले होते. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत असताना देखील खडसे यांनी टोकाची भूमिका घेत टीका केली होती. या अनुषंगाने आता एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेतच शिवाय त्यांनी प्रवेश करत असताना टोकाची भाषा वापरली होती. या सर्व बाबी लक्षात घेता त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करू नये आज मागणी चे निवेदन अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना दिले आहे.
पवारांनी खडसेंची पाठ राखण केली
भाजप सोडताना पत्रकार परिषदेत खडसेंनी दमानियांवर केलेल्या टीकेनंतर “कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घ्याल तर याद राखा मी तुम्हाला सोडणार नाही”, असा इशारा दिल्यानंतरही खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेळी पुन्हा त्याच्यावर वादग्रस्त टीका केली. यावर अंजली दमानिया माध्यमांशी बोलताना म्हणाल्या कि, “राष्ट्रवादीत प्रवेशाच्या वेळी खडसेंनी माझ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मी स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून खडसेंबाबतची तक्रार केली होती. मात्र, पवारांनी खडसे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close