क्राईम

साळेगाव खून प्रकरण अनैतिक संबंधातून; स्थानिक गुन्हे शाखेने गूढ उकलले

केज — कापूस वेचायला गेलेल्या 24 वर्षीय महिलेचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना साळेगाव येथे घडली होती.मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत काही तासातच खुनातील आरोपींना ताब्यात घेतले आहे. सदर खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

साळेगाव येथील 24 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती यावेळी अज्ञात इसमाने तिचा स्कार्फ च्या साह्याने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत असताना त्यांना या महिलेचा मोबाईल आढळून आला त्या आधारे त्यांनी तपासाला गती दिली असता पंकज भगवान जाधव यांने मोबाईल वरून सदर महिलेशी संपर्क केल्याचे उघडकीस आले. तसेच पंकज जाधव यांने महिलेशी शरीर संबंध केलेला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने त्याचा मित्र धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यास फोन करून शेतात बोलावून घेतले. त्यांने देखील या महिलेला शरीरसंबंधाची मागणी केली मात्र तिने हा प्रकार आपल्या पतीला सांगण्याची व पोलिसांमध्ये तक्रार देण्याची धमकी दिली. यामुळे दोघांनी तिच्या हातावर मारून हातातील मोबाईल हिसकावून घेतला त्यानंतर धनंजय इंगळे याने तिला ओढत नेऊन कापसातील शेतात बलात्कार केला. घडलेला सर्व प्रकार घरी माहिती होण्याच्या भीतीने त्यांनी या महिलेचा स्कार्फ ने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. प्रेत काही अंतरावर नेऊन कापसाच्या शेतात टाकला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील पो.नि. प्रदीप त्रिभुवन, स.पो.नि संतोष मिसळे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच लातूर येथून श्वानपथक बोलावण्यात आले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद केलेला आहे. तसेच सदरील महिला दोन्ही आरोपीना ब्लॅकमेल करीत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आरोपींना ताब्यात घेईपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यामुळे अंत्यविधीला ऊशीर‌ झाला .स्था.गून्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपिंना ताब्यात घेतले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close