क्राईम

बर्दापूर पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीस पाच दिवसाची पोलीस कोठडी

अंबाजोगाई — पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीस शुक्रवारी रात्री पोलिसांनी पोलिसांनी वडवणी जवळ अटक केली. ही घटना बर्दापूर येथे घडली होती. आरोपीस पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश अंबाजोगाई सत्र न्यायालयाने दिले.

बर्दापूर पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली होती. पोलिस ठाण्याजवळ ही घटना घडल्यामुळे लोकांचा रोष आणखी वाढला होता. सामाजिक रोष वाढत असल्यामुळे पोलिसांनी पुर्ण ताकत तपासामध्ये लावली यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ‌ आरोपी बर्दापूर येथील सय्यद बशारत बाबू हा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पोलिसांनी पोलिसांनी आरोपींचा असून शोध घेत असतांना संशयित आरोपी वडवणी येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपीस जेरबंद केले ही कारवाई सपोनि रवींद्र शिंदे
यांनी पीएसआय जमादार, बीट अंमलदार रोडे आणि पोना. चेवले यांच्या पथकाला वडवणीकडे पाठविले. वडवणीपासून चार किमी अंतरावर सध्या काम सुरु असलेल्या एका वॉटर प्लांटमध्ये लपलेल्या सय्यद बशारत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बर्दापूर येथे आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दारूच्या नशेत सदरील कृत्य केल्याची कबुली दिली. सय्यद बशारत हा सध्या परळीत वास्तव्यास आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा असून लॉकडाऊन पासून बर्दापुरात राहण्यासाठी आला होता. शनिवारी दुपारी बर्दापूर पोलिसांनी सय्यद बशारतला अंबाजोगाई जिल्हा व सत्र सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्या. सुरवसे यांनी त्याला 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close