क्राईम

साळेगावमध्ये महिलेचा निर्घृण खून ! गळा आवळत डोक्यात दगड घालून केली हत्या

केज — शेतात कापूस वेचणी साठी गेलेल्या 28 वर्षीय महिलेची गळा आवळून तिच्या डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना साळेगाव शिवारात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

साळेगाव येथील अश्विनी समाधान इंगळे ही 28 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी दहा वाजता कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. तिने शेतात गेल्यानंतर थोडाशा कापसाची वेचणी केली होती यावेळी अज्ञात इसमाने स्कार्फ च्या मदतीने तिचा गळा आवळला व डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. शेजारीच असलेल्या कापसाच्या शेतात तिचे प्रेत टाकले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी पाटील, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरक्षक दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close