देश विदेश

कोरोना व्हॅक्सिनचे उत्पादन सुरू — सिईओ पूनावाला

नवी दिल्ली — कोरोना रुग्णसंख्या घटत असले तरी व्हॅक्सिन कधी येणार याकडे लक्ष लागले आहे . जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हॅक्सिनच्या ट्रायल सुरू आहेत . त्यात ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड लस आघाडीवर आहे . कोविशिल्डची निर्मिती भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करणार असून व्हॅक्सिनबाबत सीईओ आदर पूनावाला यांनी माहिती दिली आहे . एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले की , ऑक्सफर्डच्या कोरोना व्हायरस व्हॅक्सिनचे 100 मिलियन डोस तयार करण्याचं लक्ष्य आहे . हे लक्ष्य 2021 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याच पूनावाला यांनी सांगितलं

आदर पूनावाला यांनी म्हटलं की , सध्याची व्हॅक्सिन निर्मिती प्रक्रिया पाहता जवळपास डिसेंबरच्या शेवटी चाचणीची प्रक्रिया पूर्ण होईल . जर सर्व काही सुरळीत पार पडलं तर जानेवारीमध्ये डोस देणं शक्य होईल . ट्रायलमध्ये मिळालेल्या यशामुळे व्हॅक्सिनचं उत्पादन सुरू केलं आहे . ब्रिटनमध्ये सध्या अॅडव्हान्स ट्रायल घेतली जात आहे . त्यांच्याकडून डेटा मिळाला तर आपत्कालीन ट्रायलसाठी आरोग्यमंत्रालयाकडे अर्ज देण्यात येईल . जर त्याला मंजुरी मिळाली तर आम्हालाही भारतात अॅडव्हान्स टेस्ट करता येतील असंही त्यांनी सांगितलं . सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी व्हॅक्सिन उत्पादक कंपनी आहे . सध्या एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड यांच्यासोबत मिळून कोरोना व्हॅक्सिनवर सीरम काम करत आहे . जगात 150 हून अधिक लशींची चाचणी घेतली जात असून त्यापैकी 38 लशींची ह्यूमन ट्रायल सुरू आहे . यामध्ये मॉडर्ना , फाइजर इंक , एस्ट्राजेनेका , पीएलसी यांसारख्या कंपन्यांच्या व्हॅक्सिनची ट्रायल अंतिम टप्प्यात आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close