क्राईम

परळीत विवाहितेवर बलात्कार करून मागितली खंडणी

परळी — शहरातील भोई गल्ली मध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर सतत बलात्कार करून त्याची रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱा विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे 
वैद्यनाथ मंदिर समोर असलेल्या भोई गल्लीतील एका विवाहित महिलेवर त्याच गल्लीत राहणाऱ्या पवार आणि त्याच्या साथीदाराने संगनमताने विवाहितेच्या घरी जाऊन धमकी देत अनेकवेळा बलात्कार केला तसेच स्वतःच्या मोबाईल मध्ये त्याची रेकॉर्डिंग व फोटो काढून इतर दुसऱ्या व्यक्तीला पाठवले त्या व्यक्तीकडून दि .२७ ओक्टोम्बर २०२० रोजी पीडित महिलेला फोन करून तुझे आणि पवार या दोघांचे फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ते मी तुझ्या नवऱ्याला दाखवतो अन्यथा 70 हजार रुपये दे जर पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला व मुलांना जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिली . या घटने नंतर पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून सतत धमकी देऊन बलात्कार करणारा आणि ज्याच्याकडे फोटो आणि विडिओ रेकॉर्डिंग आहे अश्या दोघा आरोपी विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात बुधवारी 28 आॅक्टोम्बर रोजी गु. र. नं.306 /2020 कलम 376,386,506,34 भादंवि नुसार बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याच्या स. पो. नि सौ . आरती जाधव करत आहेत .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close