क्राईम

जि प चा शाखा अभियंता तावरे एसीबीच्या जाळ्यात

बीड — जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता पदावर काम करत असलेल्या वशिष्ठ तावरे यास 25 हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
जि प.च्या बांधकाम विभाग क्र. 2 चे शाखा अभियंता शाखा अभियंता वशिष्ठ मसू तावरे वय 52 वर्ष यांच्याकडे केलेल्या कामाची बिले काढण्याची विनंती घाटेवाडी तालुका केज येथील गुत्तेदाराने रस्ता मजबुतीकरण करण्याचे नऊ लाख रुपयाचे काम केले होते. या कामाची मोजमाप पुस्तिका तावरे याने 2019 मध्ये तावरे याने घरी नेली त्यामुळे या कामाचे बिल रखडले गेले.एम.बी.देण्यासाठी तीन टक्के रक्कम तावरे यांने ठरवली होती. या प्रकरणाची तक्रार गूत्तेदाराने एसी बी कडे केली. पडताळणी केल्यानंतर बार्शी नाका येथे तक्रारदाराकडून पंचवीस हजार रुपयाची लाच घेत असताना लावलेल्या सापळ्यात तावरे अलगद अडकला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपूडे, पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी पोलीस अमलदार अमोल बागलाने सखाराम घोलप हनुमंत गोरे विजयकुमार बरकडे चालक अंमलदार चालक संतोष मोरे यांनी केली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close