आपला जिल्हा

व्दारकादास मंत्री बँकेत स्वर्गीय रामेश्वरजी चितलांगे यांना श्रध्दांजली

बीड– बीड शहरातील जेष्ठ नागरीक व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वरजी चितलांगे यांचे सोमवार दि .26 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले त्यांना बँकेच्या सभागृहात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .

बँकेचे विद्यमान संचालक प्रदीपजी चितलांगे यांचे वडील स्वर्गीय रामेश्वरजी चितलांगे यांची बँकेच्या विस्तारात मोलाची भूमिका राहीली असून त्यांनी काही वर्ष बँकेचे अध्यक्ष पद देखील भूषविलेले आहे . त्यांचे नेतृत्व कर्तव्यदक्ष होते व ते अत्यंत संयमी व मनमिळावु होते . त्यांना श्रध्दांजली अर्पण करतांना बँकेचे उपाध्यक्ष ओमप्रकाशजी जाजु यांनी सांगीतले की , रामेश्वरजी चितलांगे यांचे एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व होते , त्यांच्या सोबत मी व्दारकादास मंत्री बँकेसह विविध शैक्षणीक संस्थेमध्ये मोलाचे काम केले असून बँकेत काम करतांना त्यांची निर्णय क्षमता ठाम होती व ठोस असे निर्णय ते घेत असत जे संस्थेच्या हिताचे होते . बँकेच्या सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांनी केलेल्या कामाचे रुपांतर बँकेच्या प्रगतीत झाले व बँक नावारुपास आली आहे . राजस्थानी सेवा समाज , चंपावती शिक्षण संस्था व ईतर विविध संस्थामध्ये महत्वाचे पद व भूमिका त्यांनी बजावली आहे . तसेच शहरातील प्रसिध्द कर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे . त्यांचे निधनाने बँकेचे पदाधिकारी , संचालक सदस्य , अधिकारी व कर्मचारी यांना अतिशय दुःख झाले असून चितलांगे परिवाराची हानी झाली आहे या दुःखात आम्ही सहभागी आहोत . चितलांगे परीवारास या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो व मृतात्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थणा करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.सोनी यांनी आपल्या भावना व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली . यावेळी बँकेचे संचालक रतिलालजी दुग्गड , सर व्यवस्थापक श व्ही.पी.कोरडे , बँकेचे अधिकारी व कर्मचारी इ . उपस्थीत होते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close