आपला जिल्हा

तेलगाव येथील चौक होत आहे अतिक्रमण मुक्त

तेलगाव — बीड – परळी रोडवर तेलगाव येथे मोठा चौक आहे. या चौकातील अतिक्रमण वाढल्यामुळे चौकात आणि गावातील या रस्त्यावर कोणाला थांबता येत नव्हते. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची मोहीम नॅशनल हायवेच्या अभियंत्यांनी हाती घेतली.

आज जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी हे काम चालू असताना पाहणी केली. देशमुख यांनी देखील अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती. आता माजलगाव – धारूर या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अतिक्रमण असल्याने त्या भागातील लोकांसह जाणाऱ्या येणाऱ्या जनतेला यापासून त्रास होत असतो. बाजारपेठेतही अडचण होते. त्यामुळे रस्ते अतिक्रमण मुक्त असायला हवीत.

तेलगावचे अर्ध्यावर अतिक्रमण आज निघाले. अनेकांनी आज रात्रीपर्यंत अतिक्रमण स्वतःहून काढत आहोत, असे अभियंत्यांना सांगितले. त्यामुळे रस्ता मोकळा श्वास घेताना दिसत आहे. रस्त्यालगतच्या व्यापाऱ्यांना देखील आता अतिक्रमणामुळे होणारा गर्दीचा सामना करावा लागणार नाही. लोकांनी आता या जागेवर पुन्हा अतिक्रमण करू नये आणि लोकांना व्यवस्थित जाता येता यावे, यासाठी काळजी घ्यावी, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान देशमुख यांनी पाहणी करताना सोबत असलेल्या अभियंत्यांबरोबर चर्चा केली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close