देश विदेश

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना कोरोना ची लागण

नवी दिल्ली — रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोना ची लागण झाली असून त्यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.


गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की मला कोरोनाची लागण झाली असून माझ्यात कोरोना ची कुठलीही लक्षणे नाहीत. माझी तब्बेत आता ठिक आहे. माझ्या संपर्कातील लोकांनी काळजी घ्यावी. आयसोलेशनमध्ये राहुन मी काम करणार आहे. आरबीआयमधील काम सामान्य पद्धतीने सुरू राहील. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलिफोनद्वारे डेप्युटी गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्कात राहणार असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close