महाराष्ट्र

काळ्या टोपीखालील डोक्यात मेंदू असेल तर मोहन भागवत यांचे भाषण ऐका म्हणजे हिंदुत्व कळेल — ठाकरे

मुंबई – भारतामध्ये कुठे पीओके दिसत असेल तर ते हे प्रधानमंत्री मोदींचे अपयश आहे. काळ्या टोपी खाली डोकं असेल व त्यामध्ये मेंदू असेल तर त्यांनी मोहन भागवत यांचे दसरा रॅलीत केलेले भाषण जरूर ऐकावे म्हणजे त्यांना हिंदुत्व कळेल, घंटा थाळ्या बडवणार आमचं हिंदुत्व नाही.अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाना साधला.शिवसेनेची वार्षिक दसरा रॅली रविवारी दादरच्या सावरकर स्टेडियम मध्ये झाली, यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेचा दसरा मेळावा पारंपारिकपणे शिवाजी पार्क मैदानावर होतो, परंतु कोरोनामुळे पहिल्यांदाच दसरा रॅली स्टेडियम मध्ये घेण्यात आली. हा कार्यक्रम पक्षाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना लक्ष करत मोहन भागवत यांचे दसरा रॅलीमध्ये केलेले भाषण ऐकायला सांगितले आहे, ज्यात त्यांनी हिंदुत्व म्हणजे मंदिरांमध्ये पूजा करणे नाही, आणि तुम्ही आम्हाला म्हणत आहात की मंदिर न उघडल्यास आपण धर्मनिरपेक्ष होत आहात. जर ‘काळ्या टोपी’च्या खाली जर डोकं असेल तर मुख्य भाषण ऐका. आम्हाला नेहमीच मोहन भागवत हे आपल्या देशाचे राष्ट्रपती व्हावे असे वाटत होते, परंतु त्यांना ते नको आहे. यावेळी भाजपवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते माझे सरकार पाडण्याच्या विचारात आहेत, परंतु मी सांगू इच्छितो की त्यांनी आधी त्यांचं सरकार वाचवावं. मी बिहारच्या लोकांना आपले डोळे उघडे ठेवून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, मराठा, ओबीसी समाजाला न्याय हवा आहे. मी सर्वांना विनंती करतो की, कोणतेही फूट नको, आपल्याला महाराष्ट्रासाठी एकरूप राहिले पाहिजे असे सांगतानाच जीएसटीचे पैसे केंद्राकडे थकलेले असल्यामुळे राज्याची परिस्थिती आणखी खालावली आहे. मोदींनी जनतेची माफी मागून जीएसटी फसली असल्याचे जाहीर करावे व जुनी कर प्रणाली लागू करावी असं सांगतानाच भारतात कुठे पीओके दिसत असेल तर ते मोदींचे अपयश असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला तसेच जनतेचा कुटुंब प्रमुख म्हणून स्वतःवर असलेल्या जबाबदारीची देखील जाण असल्याचं सांगितलं.
उद्धव सरकारने महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभांवर बंदी घातली आहे, ज्या अंतर्गत कोरोनाच्या सुरक्षा प्रोटोकॉलला ध्यानात घेऊन दसरा रॅली स्टेडियम मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close